उस्मानाबाद : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध मद्य विरोधी कारवाईसाठी ३० जुलै रोजी पहाटे पासून गस्तीस होते. यावेळी पथकाने विविध ठिकाणी छापा मारून दारू निर्मितीसाठीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तुळजापूर तालुक्यातील येडोळा शिवारात असलेल्या खंडाळा नदी पात्राजवळील गावठी दारु निर्मीतीच्या अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे येडोळा ग्रामस्थ सुनिल तिप्पु पवार हे गावठी दारू निर्मीती करताना आढळले. घटनास्थळी गावठी दारु निर्मीतीचा गुळ-पाणी मिश्रणाचा एकुण ३ हजार ६०० लिटर आंबवलेला द्रव हा लोखंडी पिंपांत असलेला एकुण अंदाजे १ लाख ८० हजार रूपये किंमतीचा माल आढळला. गावठी दारू निर्मितीचा द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने पथकाने तो जागीच ओतून नष्ट केला. तसेच नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. २३८/२०२२ हा महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- ६५ (ई) अंतर्गत नोंदवला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून नळुदर्ग पो.ठा. चे सपोनि सिध्देश्वर गोरे यांसह पथकाने केली आहे. दरम्यान, नळदुर्ग पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.