27.3 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबादकोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ग्रामीण व्यक्तींना चाचणी करण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ग्रामीण व्यक्तींना चाचणी करण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील घरातील व्यक्तींचे स्वॅब अथवा रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका मिळत नसल्याने व खाजगी वाहनचालकांचा नकार मिळत असल्याने कोरोना चाचणी करण्यास अडचणी येत आहेत. ग्रामीण भागात अशा अडचणी येत असल्याने इच्छा असूनही कोरोना टेस्ट करण्यास विलंब होत आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय ग्रामीण रुग्णालयात कोरोना चाचणी होत असल्याने दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील घरच्या व्यक्तींचे स्वॅब अथवा रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करणे गरजेचे असते. परंतू ग्रामीण भागात रुग्णवाहिका मिळत नसल्याने व कोरोना चाचणी करण्यासाठी गावातील खाजगी वाहनचालक येत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. असाच प्रकार चार दिवसापुर्वी मोहतरवाडी येथे घडला आहे. मोहतरवाडी येथील एका घरातील दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते.

त्यांची तेर येथील ग्रामीण रुग्णालयात रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरी तीन महिला होत्या. त्यापैकी एका वयस्कर महिलेला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. परंतू त्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी तेर ग्रामीण रुग्णालयात जाण्यासाठी दोन दिवस रुग्णवाहिका मिळाली नाही. गावातील एकही खाजगी वाहनचालक त्या महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यास तयार झाला नाही. शेवटी त्या महिलेच्या एका नातेवाईकाने दुचाकीवर घेऊन जाऊन त्या महिलेची कोरोना चाचणी तेर ग्रामीण रुग्णालयात केली. त्या चाचणीमध्ये ती महिला कोरोना पॉझिटिव्ह आली आहे.

असाच प्रकार ईर्ला ता. उस्मानाबाद येथे चार दिवसापुर्वी घडला. गावातील एक शासकीय कर्मचारी तेर ग्रामीण रुग्णालयात केलेल्या चाचणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्या कर्मचाèयाच्या घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यासाठी तेर ग्रामीण रुग्णालयात जायचे होते. सरकारी रुग्णवाहिकेची दोन दिवस वाट पाहिली पण रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. गावातील एकही खाजगी वाहनचालक भितीमुळे तेरला जाण्यास तयार झाला नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे ग्रामीण भागात दिसून येत आहेत.

तेरच्या ग्रामीण रुग्मालयात दररोज रॅपीड अ‍ॅन्टीजेन टेस्ट केल्या जातात. त्यापैकी बरेचजण कोरोना पॉझिटिव्ह निघतात. त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालय qकवा कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येते. परंतु त्या रुग्णांना उस्मानाबादला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

ग्रामीण कोरोना रोगाचे गांभिर्य नसल्याने नागरिक कोणत्याही आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. तोंडाला मास्क लावलेला नसतो. सॅनिटायझरचा वापर केला जात नाही. पान, तंबाखू, गुटखा, सुपारी खाऊन लोक कोठेही पचापच थुंकतात. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला की त्याच्या कुटुंबातील बहुतांश व्यक्ती पॉझिटिव्ह निघत आहेत. अनेकांना कोरोनाची लक्षणे असतानाही किराणा दुकानात मिळणाèया गोळ्या खाऊन अनेक नागरिक आजार अंगावर काढत आहेत. काहीजण खाजगी दवाखान्याचा आधार घेत आहेत. खाजगी दवाखान्यातही कोरोनाची तीव्र लक्षणे असतील तरच त्याला सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे.

कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये -सुखबीर सिंग बादल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या