28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउस्मानाबादनुकसान भरपाईच्या मागणीसाठी विनायकराव पाटील यांचे उपोषण सुरू

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी विनायकराव पाटील यांचे उपोषण सुरू

एकमत ऑनलाईन

उमरगा : अतिवृष्टिमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्याला नुकसान भरपाई देण्यापासून वगळण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा नुकसान भरपाई मध्ये समावेश करावा व शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी कवठा ता. उमरगा येथील सेवाग्राम येथे बुधवार दि. ३१ ऑगष्टपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.

वयाच्या ७४ व्या वर्षी विनायकराव पाटील यांनी गेल्या दोन दिवसापासून आत्मक्लेश आमरण उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे दिसून आले. शेतकर्‍यांना खरीप नुकसान भरपाई पोटी हेक्टरी २५ हजार रूपये देण्यात यावेत. अशी प्रमुख मागणी त्यांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासनाने शेतकर्‍यांना तातडीने न्याय देण्यात यावा, अन्यथा गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या कालावधी दरम्यान सदरचे उपोषण सुरूच राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या