30.8 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी या भाजपच्या सूत्रानुसार तेर बूथ अंतर्गत येणाèया गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेवून त्यांनी मतदारांना आवाहन केले. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या संदर्भाने गेली अनेक दिवस जिल्हाभर दौरा करून प्रत्येक तालुका आणि शहरातील बूथ प्रमुख व पदाधिका-यांच्या बैठक घेऊन प्रचार यंत्रणेचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यातील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या बूथ मधील २० मतदारांचे नियोजन दिले गेले आहे. या कार्यकत्र्यांनी २० मतदारांपर्यंत जाऊन भाजपचे उमेदवार बोराळकर यांना मत देण्याची विनंती करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या अनुषंगाने तेर येथे भेट देऊन आ. पाटील यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदान प्रक्रिया समजून घेऊन नीट मतदान करण्याचे तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच संत विद्यालय येथेही भेटी देवून शिक्षक व शिक्षकांनाही भाजपा उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शिवाजीराव नाईकवाडी, बुथप्रमुख प्रदीप शिंदे , सरपंच नवनाथ नाईकवाडी, पद्माकर फंड, विठ्ठल लामतुरे, बालाजी पांढरे, बापू नाईकवाडी, मजीद मणियार, नरहरी बडवे, इर्शाद मुलाणी आदींची उपस्थित होती.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या