24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeउस्मानाबादमांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मांजरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एकमत ऑनलाईन

कळंब : जिल्ह्यातून वाहणाऱ्या तेरणा आणि मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील निम्न तेरणा धरण तसंच तसेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणही सततच्या पडत असलेल्या पावसामुळे आणि या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ही धरणे भरण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातील पाणी तेरणा नदीमार्गे तसेच मांजरा नदी मार्गे सोडावे लागणार असल्यामुळे तेरणा नदीकाठी आणि मांजरा नदी काठी वस्ती करून राहणारे नागरिक गावकरी तसेच शेतकरी यांना सतर्कतेचा इशारा लातूरच्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी दिला आहे.

सध्या निम्न तेरणा प्रकल्पात 603 मिलिमीटर पाणी पातळी असून धरणातील उपयुक्त पाणीसाठा एक्काहत्तर पूर्णांक पंचेचाळीस टक्के इतका आहे तर मांजरा धरणात 641 पूर्णांक 53 मिलिमीटर इतका पाणीसाठा असून 80 टक्के धरण भरलेले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत राहिल्यास धरण केव्हाही भरल्यास मांजरा नदीकाठची गावे तसेच तेरणा नदीकाठावरील गावात पाणी तेरणा नदी मार्ग सोडावी लागणार असल्यामुळे या दोन्ही नद्या काठचे शेतकरी नदीकाठी वस्ती करून राहिलेल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. देण्यात आला आहे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या