24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeउस्मानाबादधुव्वाधार; नदी, नाले तुडूंब भरुन खळखळले, प्रकल्प ओव्हरफ्लो

धुव्वाधार; नदी, नाले तुडूंब भरुन खळखळले, प्रकल्प ओव्हरफ्लो

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात मंगळवार, बुधवार या दोन दिवसापासून सुर्यदर्शन नाही. सततच्या संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे तुडूंब भरुन खळखळत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे प्रकल्प तुडूंब भरले असून काही ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यात काही प्रकल्प भरल्यामुळे प्रकल्पाच्या पाळूला भेगा पडल्या आहेत. धोका टाळण्यासाठी भर पावसात प्रशासनाची धावपळ उडाली. तर अनेक गावास वाहतुक होणाèया पुलावरुन पाणी गेल्यामुळे बुधवारी (दि.१४) जिल्ह्यात अनेक गावचा संपर्क तुटल्याचे पहावयास मिळाले.

दमदार पावसामुळे मांजरा धरण ७७ टक्के भरले
सतीश टोणगे : बीड-लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील १७२ गावाची तहान भागवणा-या मांजरा धरणात १४ ऑक्टोबर रोजी सकाळपर्यंत ७६ टक्यांच्याही पुढे पाणी संचय झाला आहे. धरणक्षेत्रात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याही वर्षी धरण पुर्णक्षमतेने भरेल अशी आशा आहे.

मांजरा धरणाच्या वरच्या बाजुस नदीच्या उगमस्थानापासुन १४ बंधारे आणि लहानमोठे असे २६ तलाव निर्माण करण्यात आल्यामुळे अलिकडील कांही वर्षात मांजरा धरण भरण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. बीड-लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १७२ गावांची तहान मांजरा धरणावर आहे. १४ ऑक्टोबर रोजी मांजरा धरणात ७६ टक्यापेक्षाही जास्त पाणीसाठा झाला आहे. येत्या काही दिवसात धरण भरल्याची गोड बातमी ऐकायला मिळेल. मांजरा धरणाची पाणी साठवण क्षमता २२४.०८३ दलघमी एवढी असून आज धरणात १७१.१८३ दलघमी पाणीसाठा झाला आहे. धरण पुर्णक्षमतेने भरण्यासाठी ५४ दलघमी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. मांजरा नदीचा प्रवाह लक्षात घेतला तर प्रति सेकंदास ४.९१८ घनमीटर एवढे पाणी धरणक्षेत्रात जमा होत आहे. धरणक्षेत्राच्या कँचमेंट एरीयात आणखी जोराचा पाऊस झाला तर हे प्रमाण वाढु ही शकेल. मांजरा नदीची क्षमता प्रति सेकंदास १६६.४४२ घनमीटर एवढे पाणी धरणात आणण्याची आहे.

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टी, तलाव फुटण्याची भिती
तालुक्यात मंगळवार रात्री व बुधवारी २४ तासात झालेल्या पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली. वाèयासह झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्यातील अनेक भागातील जनजीवन विस्कळित झाले होते.

तुळजापूर शहरासह तालुक्यांतील अनेक ग्रामीण भागात अतिवृष्टी झाल्याने अनेकांची अतोनात नुकसान झाले. काही घरांची पडझड झाली तसेच शेकडोंच्या घरात पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. तालुक्यातील पाचुंदा तलाव व हंगरगा तलाव दोन्ही तलावाच्या मदोमद असलेले हंगरगा (तुळ) गाव तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या गाव पाण्यामध्ये आहे. नागरिकांच्या घरात कंबरेला पाणी आहे. तलाव ओव्हेरफ्लो झाल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाच ते सहा फुट पाणी साचले आहे. गावातील वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. तसेच शेतीतातही पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पाचुंदा तलाव लिकेज झाल्यामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे. गावाची अनेक वर्षांपासून असलेली पुनर्वसनाची मागणी आता तरी प्रशासन गांभिर्याने घेईल का असा प्रश्न रोहित चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

उमरगा तालुक्यात ऊसाचा सफाया; तुर,सोयाबीनचे नुकसान
प्रदिप भोसले उमरगा :तालुक्यात ऊसाचा फड आडवे झाले. तुर पाण्यात उभी आहे. सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या. दुबार पेरणी, अतिवृष्टी आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे धो धो कोसळणाèया पावसाने असले नसले सर्व काही हिरावून घेतले. जवळपास अशीच अवस्था उमरगा तालुक्यातील बहुतांश शेतकèयांची झाली आहे. जवळपास १४ तास पाऊस झाल्याने शेतक-यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

तालुक्यातील जवळपास सर्वच नाले, ओढयांना पुर आला. सकाळपासून सर्वच खेड्याचा तालुक्याचा संपर्क तुटला. उमरगा कासारशिरसी रस्त्यावरील मुळज व कुन्हाळी येथे पुलावरून पाच ते सहा फुट पाणी वाहत असल्याने वाहतुक बुधवारी दुपारपर्यंत बंद होती. मुरळी येथील बेन्नितुरा नदीला पुर आल्याने शेतीमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरामुळे उमरगा ते गुलबर्गा वाहतुक चार तास बंद होती. दोन्ही बाजूने जवळपास पाच किलोमीटर पर्यंतच्या रांगा उभ्या होत्या. दाळींब येथील घरामध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुळज, त्रिकोळी, कुन्हाळी शिवारात कित्येक सोयाबीनच्या गंजी पाण्यात तरंगत आहेत. बेडगा, डिग्गी, भिकार सांगवी येथे बेन्नितुरा नदीला आलेल्या पुराचा तडाखा शेतकèयांच्या पिकाला बसला आहे.

लोहारा येथे अनेकांच्या घरात, दुकानात पाणीच पाणी
अब्बास शेख लोहारा : शहरासह तालुक्यामध्ये मंगळवारी रात्री व बुधवारी पडलेल्या पावसामुळे मोठ्या जोमाने पावसाने हजेरी लावल्याने शेतकèयांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतात तुडुंब पाणी साचल्याचे दिसून आले. अनेकांच्या घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी पंचायत झाली. नगरपंचायतचे नियोजन नसल्याने नागरिकांना पाण्याला वाट काढून देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. लोहारा ते माकणी जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होता. यामुळे शेतकरी अडकून पडले. लोहारा ते कानेगाव जुना रस्त्यावरील नदीच्या पात्रावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली.

यामुळे अनेक शेतक-यांना शेताकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने व रात्री मुक्कामी गेलेल्या शेतक-यांना दिवसभर घर गाठता आले नाही. पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रहदारीच्या मार्गावरील वाहतूक होऊ नये यासाठी दक्ष होते. शहरालगत असलेल्या भदबदी पुलाच्या वरील लोखंडी अँगलवरून पाण्याच्या प्रवाहामुळे पाणी वाहत होते. शहरातील दोन दिवस सतत पडलेल्या पावसामुळे बाबुराव विरुदे पांडुरंग लोहार,विमल qशदे, सास्तुर येथील संगीता कोकणे, व्यापारी संभाजी पोतदार सह आदी नागरिकांच्या घरामध्ये व दुकानदाराच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठीच पंचाईत झाली.

’सावधान! शंभर दिवसानंतर दुसऱ्यांदा होऊ शकतो करोना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या