33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home उस्मानाबाद ठेकेदाराच्या मनमानीमुळे घरात, शेतात शिरले पाणी

ठेकेदाराच्या मनमानीमुळे घरात, शेतात शिरले पाणी

एकमत ऑनलाईन

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील तडवळा गावापासून उस्मानाबादकडे जाणा-या बायपास मार्ग रस्ता काम झाले. यावेळी ठेकेदाराने नियोजनशुन्य केलेल्या कामाचा फटका शेतकरी, ग्रामस्थ व वाहतुकदारांना बसला आहे. या कामाची पहिल्याच झालेल्या मोठ्या पावसात पोलखोल झाली आहे. त्यामुळे या कामाची गुण नियंञक पथकाकडून गुणवत्ता चौकशी करुन दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त शेतकरी व ग्रामस्थांमधून केली जात आहे.

तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे वाहनांची गर्दी होवुन कोंडी होवु नये, म्हणून सोलापूर-नळदुर्ग-लातूरहुन येणारे वाहने तिर्थक्षेञ तुळजापूरात गर्दी करु नये. थेट उस्मानाबादला जाण्यासाठी उस्मानाबाद बायपास रस्ता तयार केला. या अंतर्गत लातूरहुन तुळजापूरकडे येणा-या रस्त्यावर काक्रंबा गावाजवळुन तडवळा मार्ग उस्मानाबाद बायपासकडे जाण्यासाठी बायपास रस्ता करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र हे काम करताना त्या रस्त्यावर असणा-या गावातील ग्रामस्थांचा सोयी गैरसोयीचा विचार केला गेला नाही.

ठेकेदाराने ठराविक लोकांना हाताशी धरुन दलालांचा माध्यमातून दडपशाही करुन काम उरकण्याचा प्रयत्न केला. याचा परिणाम सर्हीस रस्ता न केल्याने व पाणी वाहुन जाण्यास कुठलाही मार्ग न केल्याने हे थांबलेले पाणी शेतात गावातील शेतकèयांच्या घरात गोठ्यात घुसले. यावेळी एखाद्या ग्रामस्थांने तक्रार करताच दलालांमार्फत त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न झाला. पर्यायाने ठेकेदाराने मनमानी पध्दतीने काम केले. यात पावसाचे पाणी काढुन देण्याचा नियोजनाकडे दुर्लक्ष केल्याने नुकताच झालेल्या पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी कुठलीही उपाययोजना न केल्याने आज पावसाचे पाणी आडुन ते शेतात तसेच झोपडपट्टी घुसले.

काही रस्त्यावर थांबल्याने शेतकरी गोरगरीब व प्रवासी वाहतूक करणा-या वाहन चालकांना गैरसोयीस सामोरे जावे लागले. यात शेतक-यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या उभे पिके हातून गेली. याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करुन शेतकरी ग्रामस्थांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी ग्रामस्थांमधून केली जात आहे. नुकसान भरपाई न दिल्यास शेतकरी, ग्रामस्थ आंदोलन करण्याचा पाविञ्यात आहे.

सर्विस रस्ता काम रखडले
सर्विस रस्ते काम रखडल्याने शेतकरी ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. सदरील ठेकेदाराने अद्याप सव्र्हीस रस्ते तयार न केल्याने हे नुकसान झाले आहे. बायपास रस्ता कामामुळे शेतक-यांच्या शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनानेही या मंडळींना वा-यावर सोडल्याने लोकप्रतिनिधी तरी आमच्यावर आलेल्या संकटाची दखल घ्यावी, अशी मागणी त्रस्त शेतकरी, ग्रामस्थांमधून केली जात आहे.

मराठा समाज आक्रमक : मुंबईत मोठ्या प्रमाणात ठिय्या आंदोलने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या