19.1 C
Latur
Monday, January 18, 2021
Home उस्मानाबाद अंध अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय ?

अंध अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय ?

एकमत ऑनलाईन

नळदुर्ग (सचिन गायकवाड) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर सर्वच शाळा महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शासनाने समोर ठेवला आहे सध्या स्मार्टफोनच्या माध्यमातून सर्वच वर्गातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण संध्या जोरात सुरू आहे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील अंध अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचे धडे केव्हा मिळणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

कोविड १९ पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय यांच्याकडून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील गाव खेड्या – पाड्यातील शिक्षण घेत असलेल्या अंध अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणीत मोठी वाढ होत चालली आहे. जिथे सर्व सुविधा शिक्षण प्रणालीसाठी उपलब्ध आहेत तिथे हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे शिक्षण दिले जात आहे?

कोविड १९ काळातील अंध अपंग मूक-बधिर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो हे सर्व विद्यार्थी वार्‍यावर असल्याचे सध्याचे तरी चित्र पाहायला मिळत आहे शिक्षण हे सर्वांनाच मिळायला हवे मात्र कोविड १९ सारख्या भयावह परिस्थिती मध्ये अंध अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते की काय अशी आज रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील परिस्थिती आहे शालेय शिक्षण असो अथवा ऑनलाइन शिक्षण असो शिक्षण सर्वांनाच मिळवायला हवे मग तो श्रीमंत, गरीब, अंध, अपंग, मूकबधिर विद्यार्थी असो प्रत्येक विद्यार्थ्यांचा नैतिक अधिकार आहे.

त्यानुसार शासनाकडून सर्वत्र विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले जातात मग अंगणवाडी असो शाळा किंवा विविध संस्था त्याच्या पद्धतीने ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या दृष्टिकोनातून शासनाने ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा स्वीकार करण्याचे सर्व शाळा, महाविद्यालये यांना सूचित केले त्यानुसार कामकाजही सुरू झाले मात्र हे शिक्षण गाव खेड्यातील अतिदुर्गम भागात वाड्या, वस्ती, तांडे तसेच जिल्ह्यातील सीमावर्ती भागामध्ये ऑनलाइन शिक्षणाचा गंध पोहोचलाच नाही. जिल्ह्यातील ऑनलाइन शिक्षण प्रणाली विशेष म्हणजे अंध अपंग मूकबधिर मुलांसाठी चालणाऱ्या शाळांची जबाबदारी नाही ?

प्रामुख्याने अपंगासाठी असणाऱ्या शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जाते का अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी स्वयं रोजगार निर्मितीचे धडे ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते का अंध अपंग व मूकबधिर विद्यार्थी केवळ नोकरीच नव्हे तर स्वंय रोजगार करू शकतील का हा उद्देश शासनाचा व शैक्षणिक प्रणालीचा आहे . बऱ्याच ठिकाणी शासन सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. आताच्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीतील अंध अपंग मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळा ऑनलाइन शिक्षणाच्या बाबतीत निरुपयोगी ठरले आहे असेच म्हणावे लागेल

लोहा शहरातील सर्व नागरिकांनी कोरोना टाळण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेत सहभागी व्हावे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या