17.5 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home उस्मानाबाद वाशीचा वीज उपकेंद्राचा विषय केव्हा मार्गी लागणार

वाशीचा वीज उपकेंद्राचा विषय केव्हा मार्गी लागणार

वाशी तालुक्यातील पारडी ते भूम या विद्युत वाहिनीच्या दुरुस्तीसाठीचे कामकाज आम्ही मंजूर करून आणले असे वाशी येथील शिवसेना नेत्यांचे म्हणणे म्हणजे वरातीमागून घोडे असल्याचा प्रकार आहे असे म्हणत वाशी नगरपंचायतचे विरोधीपक्ष गटनेते सुरेश कवडे यांनी येथील नेत्यांवर निशाणा साधला आहे. या विद्युत वहिनीचे दुरुस्तीचे काम अगोदरच वीज कंपनीने हाती घेतले होते आणि पूर्वीच याचे टेंडर ही झालेले आहे. असे असताना वाशी नगरपंचायतची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून येथील नेते आम्हीच ते मंजूर करून आणले असे म्हणत श्रेय घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत आहेत असे ही कवडे म्हणाले

एकमत ऑनलाईन

वाशी : वाशी व वाशी तालुक्यातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी वाशी येथे १३२ के. व्ही. विजेचे केंद्र उभारणे गरजेचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून नेते मंडळीकडून याबाबत नुसती चर्चा होत आलेली आहे, मात्र अद्यापही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. वाशी व तालुक्यामध्ये विजेचे अनेक प्रश्न आहेत. सध्या वाशी तालुक्याला भूम येथील १३२ के.व्ही. वीज केंद्रावरून वीज दिली जाते. वाशी येथे विजेची मागणी मोठी आहे आणि भूम चे १३२ के.व्ही. ही मागणी पूर्ण करू शकत नाही. विजेचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे या केंद्रावरून नियमित व उच्च दाबाने वीज पुरवठा होत नाही. यामुळे वाशी येथे विजेचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

येथील अनेक नेत्यांनी अनेकवेळा आपल्या भाषणांमधून येथील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी १३२ के. व्ही. विजेचे केंद्र उभारण्याचे आश्वासन दिले आहे. सन २००५ पासून नेहमीच या प्रश्नाबाबत चर्चा होत आलेली आहे. कोणत्या ना कोणत्या निवडणुकीच्या निमित्ताने १३२ के. व्ही. वीज केंद्र रुपी एरंडाचे गु-हाळ गाळण्याचे काम गेल्या काळात अनेक नेत्यांनी केलेले आहे. येथील विद्यमान आमदार तानाजी सावंत यांच्या विधानसभा निवडणुका अजेंड्यावर हा प्रमुख विषय होता. निवडून आल्यानंतर काही दिवसांमध्येच हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी वाशी येथील प्रचार सभेत दिले होते.

येथील मतदारांनाही ते आश्वासन पटले आणि त्यांनी हा प्रश्न मार्गी लागेल यासाठी त्यांना भरभरून मते दिली. मात्र अद्याप पर्यंत हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. साहेबांची मंत्रिपदाची पोळी भाजली गेली नाही म्हणून त्यांनी वाशी करांचा १३५ के. व्ही.चा ही प्रश्न ही भाजला नाही. जनतेने त्यांना आशेने निवडून दिले आणि साहेबांनी मात्र त्यांची निराशा करून टाकली.
सध्या वाशी येथील शिवसेनेचे स्थानिक नेते या प्रश्नाला घेऊन आम्ही कसे झगडत आहोत असे दाखवत आहेत. आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिले, आम्ही अमुक मंत्र्यांशी बोललो असे वारंवार सांगत आहेत.

वाशी नगरपंचायत निवडणूक आता केवळ दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे. अशावेळी आम्हाला जनतेचा किती कनवळा आहे हे दाखवण्यासाठी हे विजेचे प्रश्न घेऊन आम्ही जनतेसाठी लढत आहोत असे दाखवले जात आहे. येथील शिवसेना नेत्यांनी तालुक्यातील पार्डी ते भूम दरम्यान च्या वीज वाहिनीच्या नूतनीकरणाचा प्रश्न मार्गी लावला. वाशी शहरांमध्ये देखील काही विजेचे बदल करण्यात आलेला आहेत. वास्तविक पाहता ही अभिनंदनीय बाब आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे येथील शोभा वाढलेली आहे, जनतेला काही अंशी दिलासा मिळालेला आहे मात्र येथील जनतेच्या विजेच्या प्रश्नाच समाधान झालेले नाही.

यामुळे १३२ के.व्ही. वीज केंद्राचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न जनता विचारत आहे. येथील नेत्यांनी पालक मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे या वीज केंद्राबाबत निवेदन दिलेले आहे असे सांगितले जात आहे. आता पालकमंत्र्यांना या प्रश्नाबाबत किती तळमळ आहे, त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य आहे का, आता ते किती दिवसांमध्ये हा प्रश्न मार्गी लावतात हे पहावे लागणार आहे.

कुलस्वामिनी विद्यालयाकडून फिसबाबत मनमानी कारभार

ताज्या बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

आणखीन बातम्या

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...

राज्य सरकारमध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ लागेना

उस्मानाबाद : सध्याचे सरकार शाळा चालु करायच्या का नाही, विज बिले कमी करायचे का नाही, १०० युनिट मोफत द्यायचे का नाही, याबाबत गोंधळलेली आहे....
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...