31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादअनुदानासाठी बेमुदत दूध बंद आंदोलन करणार; भूममध्ये बैलगाडी मोर्चा दरम्यान शेट्टी यांचा...

अनुदानासाठी बेमुदत दूध बंद आंदोलन करणार; भूममध्ये बैलगाडी मोर्चा दरम्यान शेट्टी यांचा इशारा

एकमत ऑनलाईन

भूम : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्यात यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दुधबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला. भूम येथे शुक्रवारी (दि. २८) बसडेपो ते उपविभागीय कार्यालय बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर त्यांनी शेतकèयांना मार्गदर्शन करताना हा शासनाला इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतक-यांना प्रतिलिटर १७ ते २० रूपये दूध दर दिला जातो. दूध उत्पादक शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. विषाणूचा प्रादुर्भावाने राज्यातील दूध व्यवसायावर संक्रात आलेली आहे. लॉकडाऊनमुळे हॉटेल, आईस्क्रिम, मॉल,विवाह सोहळे आदी बंद झाले आहेत, याचा विपरीत परिणाम दुधाच्या खपावर झालेला आहे. राज्यात दररोजचे दूध उत्पादन ११९ लाख लिटर आहे.

५२ लाख लिटर दूध हे अतिरिक्त झाले आहे. तसेच दूध पावडरचा दर ३३० रूपयांवरून १८० रूपयावर आलेला आहे. कोरोनामळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चीन , युरोप व आफ्रिका या देशातील निर्यात बंद झाले आहे. देशात सध्या १.५ लाख टन दूध पावडर शिल्लक असून राज्यात देखील ५० हजार टन दूध पावडर शिल्लक आहे. तरीही केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेऊन दूध उत्पादकांना देशोधडीस लावण्याचे पाप करत आहेत.

तसेच बटरचा दर ३४० रूपयावरून २२० रूपये झाले आहे. याचा परिणाम दूध खरेदीवर झाला असून अनेक संस्था १७ ते २० रूपये लिटरने दुधाची खरेदी करत आहेत. दूध उत्पादक शेतक-यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे राज्यात पँकीग दुधात १९ लाख लिटरने घट झालेली आहे. सन २०१८ मध्ये आम्ही दूध आंदोलन केल्यानंतर शासनाने प्रति लिटर ५ रूपयेचे अनुदान जाहीर करून ७०० कोटी रूपयेचे अनुदान दूध उत्पादकांना दिले होते.

याचा फायदा राज्यातील ४६ लाख दूध उत्पादकांना झाला होता. त्याप्रमाणे राज्य सरकारने प्रतिलिटर दुधास ५ रूपयांचे अनुदान द्यावे. तसेच केंद्र सरकारने ३० हजार टन दूध पावडर बफर स्टॉक करावा. दूध पावडर करीता प्रतिकिलो ५० रूपये अनुदान द्यावे, दूध पावडर, बटर व तूप यावरील जीएसटी कमी करण्यात यावी.

या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २१ जुलै रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात एक दिवसाचे दूध बंद आंदोलन केले होते. माय बाप सरकारला जाग आलेली नाही. उत्पादन खर्चापेक्षा १० रूपये कमी दराने शेतक-यांना दूध विकावे लागत आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान देऊन २५ रूपये लिटरला भाव द्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी जनावरांसहित आलो आहोत, शेतक-यांच्या दुधाला प्रतिलिटर ५ रूपये अनुदान त्वरीत द्यावे, अन्यथा कोणत्याही क्षणी बेमुदत दूध बंद आंदोलन करनार असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला. या मोर्चाप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे बाळासाहेब पाटील यांनीही हजेरी लावून कश्या पद्धतीने सरकार दूध उत्पादक यांची कुचेष्टा लावली आहे हे सांगितले. तर मल्हार आर्मी चे संस्थाप अध्यक्ष सुरेश कांबळे यानी पाqठबा दिला.

मोहोळचे आमदार यशवंत माने यांचा जात दाखला बनावट असल्याची तक्रार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या