33.7 C
Latur
Monday, March 1, 2021
Home उस्मानाबाद उस्मानाबादच्या समांतर पाणी पुरवठा योजनेस चालना देणार : मंत्री शिंदे

उस्मानाबादच्या समांतर पाणी पुरवठा योजनेस चालना देणार : मंत्री शिंदे

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, जिल्ह्यातील पाण्याच्या स्त्रोतांची कमी असलेली क्षमता आणि शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून शहराच्या समांतर पाणी पुरवठा योजनेस चालना देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.१६) केले. उस्मानाबाद नगरपालिकेतर्फे बांधण्यात आलेल्या केंद्रशासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत शहर पाणी पुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळयात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जि.प.च्या अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, आ. कैलास पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, जि.प.चे उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी उपस्थित होते. या योजनेमुळे शहरातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने चांगले काम केले आहे. हे काम वेळेत पूर्ण झाल्याने नागरिकांना या योजनेचा लाभ होईल, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले की, या योजनेमुळे उजनी प्रकल्पातून मंजूर केलेल्या ६.६३ दशलक्ष घनमीटर पाणी उचलले जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांना दरडोई दरदिवशी १३५ लिटर पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाणीटंचाई, भुयारी गटार योजना, रस्ते यासारख्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये शहरातील १६८ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या टप्प्यावर आहे. समांतर योजनेचा प्रस्ताव आल्यास त्याचाही सकारात्मक विचार करु, त्याला चालना देऊ, महाविकास आघाडी सरकारने संकटाच्या काळातही राज्यातील जनतेच्या हितांचे अनेक निर्णय घेतले. शेतकèयांना कर्जमाफी दिली, अतिवृष्टीग्रस्त शेतकèयांना मदत केली. कोवीडच्या काळात जनतेच्या आरोग्याचे रक्षण केले. आपल्या सगळया मागण्या आघाडीचे सरकार सकारात्मक रितीने प्रश्न सोडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंत्री शिंदे यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला. नपाचे मुख्याधिकारी श्री.येलगटे यांनी आभार मानले.

आघाडी सरकारमुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण : खा. निंबाळकर
जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच नगरविकास विभागाचे मंत्री आणि सचिव जिल्ह्याच्या ठिकाणी आले. त्यांच्या विभागाच्या अधिका-यांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडविण्याचे काम करीत आहेत, ही अपूर्व अशी घटना आहे, असे सांगून १९९२ मध्येच उस्मानाबादची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाले असते. पण ते दुसरीकडेच पळविले गेले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारने आमचे हे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण केले आहे.

शहराच्या २०५० पर्यंतच्या पाण्याचा विचाराने योजना मंजूर करावी : नगराध्यक्ष राजेनिंबाळकर
यावेळी बोलताना नगराध्यक्ष निंबाळकर यांनी पुढील २०५० पर्यंतच्या शहराच्या पिण्याच्या पाण्याचा विचार करुन उजनीतून संपूर्ण पाणी मिळण्याची योजना मंजूर करावी, यासह भुयारी गटार योजनेस लवकर मंजुरी द्यावी, अपूर्ण नाट्यगृहाच्या कामास मदत करावी, भोगावती नदीच्या सुशोभीकरणास मदत करावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा आदी मागण्या केल्या.

ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या