28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादनराधमाला फाशीची शिक्षेसाठी प्रयत्न करणार : रुपाली चाकणकर

नराधमाला फाशीची शिक्षेसाठी प्रयत्न करणार : रुपाली चाकणकर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील एका अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर एकाने पाशवी अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना ३० ऑगस्ट रोजी घडली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून या गुन्ह्यातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी शुक्रवारी (दि.२) अत्याचार पिडीत मुलीची जिल्हा रूण्यालयात भेट घेवून विचारपूस करून माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, यशस्वीनी अभियानच्या राज्य समन्वयक वैशालीताई मोटे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. स्मिता गवळी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार आदींची उपस्थित होते.

पुढे बोलताना चाकणकर म्हणाल्या की, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम आरोपी हा सतत लैंगिक प्रकारचे गुन्हे करणारा असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्याच्यावर विनयभंग, बलात्कार यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून तो बाहेर आलेला आहे. सिंदफळच्या पीडित मुलीवर अत्याचार करतानाचे व्हिडीओ चित्रण त्या नराधमाने मोबाईलमध्ये केले आहे.

अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. पीडितेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून तिची भेट घेवून विचारपूस केली आहे. तीच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी अंतर्गत शस्त्रक्रिया केली असून तीची प्रकृती स्थीर आहे. मनोधैर्य योजनेतून तातडीने ३ लाख रूपयांची मदत करण्यात आली आहे. हे प्रकरण अतिशय निंदणीय असून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी पोलिस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली असून 15 दिवसात पोलिस दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या