17.4 C
Latur
Wednesday, January 26, 2022
Homeउस्मानाबादशेतकर्‍यांना समाधानकारक मदत करून अश्रू पुसणार : मुख्यमंत्री ठाकरे

शेतकर्‍यांना समाधानकारक मदत करून अश्रू पुसणार : मुख्यमंत्री ठाकरे

उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी, मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन उपाय-योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले दिसून येत आहे. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची दैनंदिन माहिती प्रशासनाकडून घेतच होतो. परंतु बुधवारी (दि.21) येथील शेतकर्‍यांना भेटून त्यांना दिलासा दिला आहे. शेतकर्‍यांनी धीर धरावा शासन खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे असून शेतकर्‍यांना समाधानकारक मदत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तुळजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबतच्या आढावा बैठकीत केले.

या बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, फलोत्पादन व रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भूमरे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषदचे अध्यक्ष अस्मिता कांबळे, आमदार ज्ञानराज चौगुले, राणाजगजितसिंह पाटील, कैलास पाटील, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उमेश घाटगे यांच्यासह जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना लवकर मदत देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

सर्व शेतकर्‍यांना लवकरात लवकर मदत पोहोचली पाहिजे. त्यासाठी प्रशासनाने शासनाकडे सर्व प्रस्ताव त्वरित पाठवावेत. शासनाकडून शेतकर्‍यांना समाधानकारक दिलासा देऊन लवकरच सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे अश्रू पुसायचे आहेत. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवाव्यात व त्याबाबतचा जिल्हा आराखडा तात्काळ सादर करावा. तसेच हा आराखडा करत असताना त्यात कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे, त्याचाही कामनिहाय क्रम कामनिहाय क्रम ठरवून घ्यावा. मराठवाड्याच्या लातूर, उस्मानाबाद हा भाग भूकंपप्रवण आहे. त्या शक्यतेचा विचार करून प्रशासनाकडून पुढील काळात या भागात कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती आल्यास त्यावरील उपाय योजना सुचवाव्यात असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

संपूर्ण राज्यात पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडून त्याचे आपत्तीत रूपांतर होईल याचा अंदाज बांधता येत नाही. काटगाव येथील पुलावरून आठ ते दहा फूट इतके पाणी गेले. त्यामुळे या भागातील पिकांची मोठी हानी झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी येणार्‍या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी पुढील काळात ठेवावी लागेल असेही सांगितले. सोयाबीन गंजीच्या नुकसानीबाबत विमा कंपनीकडून विमा संरक्षण मिळण्याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल. तसेच जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी व या पुराच्या काळात जिल्ह्यातील 128 नागरिकांचे प्राण वाचून जीवित हानी होऊ दिली नाही त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे कामाचे तसेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम चांगले सुरू असल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केले.

राज्यातील मंदिरे खुली करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी माझे कुटुंबाची जबाबदारी मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन कोविड चा प्रतिबंध करावा, असे आवाहन केले. यावेळी महसूल मंत्री थोरात यांनी अतिवृष्टीने सोयाबीन तूर ऊस कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पुरामुळे जमिनीही खरडून गेलेल्या आहेत. शासनाकडून शेतकर्‍यांना मदत देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी अतिवृष्टीने व पुरामुळे विहिरीमध्ये गाळ साठलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेतून तो गाळ काढता येईल असे सांगितले तसेच रोहियो तुन पाणंद व शेत रस्ते घेता येतील असेही त्यांनी सूचित केले.

पालकमंत्री शंकराव गडाख यांनी जिल्ह्यतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर,आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकर्‍यांच्या समस्या मांडून त्या सोडविण्याची मागणी केली तर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीही मराठवाड्यातील पाटील जिल्ह्यातील अतिवृष्टी व पंचनाम्याची माहिती सादर केली. प्रारंभी उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात वीज पडून दोन नागरिकांचे प्राण गेले त्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात मदतीचे धनादेश देण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील पीक नुकसान पाहणीची सुरुवात काटगाव येथील शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी करून झाली.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पंचनामे त्वरित पूर्ण करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या