21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादगोविंदपूर येथे महिलेला मारहाण करून अंगावरील सोने लुटले

गोविंदपूर येथे महिलेला मारहाण करून अंगावरील सोने लुटले

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे एका महिलेला एकाने मारहाण करून तीच्या कानातील सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ७ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास त्या महिलेल्या घरी घडली. या प्रकरणी त्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शंकर मुंढे याच्या विरोधात शिराढोण पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदपूर ता. कळंब येथील कमल गायकवाड ह्या गोविंदपूर येथील आल्या घरात असताना ७ ऑगस्ट रोजी रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास गावातीलच शंकर मुंढे यांनी घरात प्रवेश केला. कमल गायकवाड यांच्या घरात घुसून जुन्या वादाच्या कारणावरुन कमल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कमल यांच्या कानास असलेले अंदाजे ७ हजार रूपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याची फुले जबरदस्तीने काढून घेवून पसार झाला. या मारहाणीत कमल यांच्या डाव्या कानास दुखापत होवून त्या जखमी झाल्या. या प्रकरणी कमल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर मुंढे याच्या विरोधात ९ ऑगस्ट रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या