28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत महिला लाईनमनला हातपाय तोडण्याची धमकी

उस्मानाबादेत महिला लाईनमनला हातपाय तोडण्याची धमकी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : चोरून वीज वापरण्यासाठी पोलवर टाकलेला आकडा काढत असताना महिला लाईनमनला हातपाय तोडण्याची धमकी एकाने दिली. ही घटना उस्मानाबाद शहरातील अजिंठानगर येथे ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी महिला लाईनमनने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात कलम ३५३ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंठानगर, उस्मानाबाद येथील विद्युत पुरवठा बंद पडल्याची तक्रार आल्याने महावितरण कर्मचारी शुभांगी सरवदे ह्या ३१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेल्या. यावेळी अजिंठानगर येथील सुनिल चिलवंत यांनी विद्युत खांबावर आकडा टाकुन विज चोरी करत असल्याचे समजले. त्यामुळे शुभांगी सरवदे ह्या तो आकडा काढत असताना सुनिल चिलवंत यांनी त्यांना शिवीगाळ करुन मारण्यासाठी हात उगारुन, तुम्ही आकडा काढण्याचा प्रयत्न केला तर तुमचे हातपाय मोडु. अशी धमकी देवून चिलवंत यांनी सरवदे यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. या प्रकरणी शुभांगी सरवदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या