21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeउस्मानाबादबस प्रवासात महिलेचे २.७६ लाखांचे सोन्याचे दागीने लंपास

बस प्रवासात महिलेचे २.७६ लाखांचे सोन्याचे दागीने लंपास

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : औरंगाबाद ते उस्मानाबाद बसने प्रवास करीत असताना एका महिलेचे २ लाख ७६ हजार रूपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना ७ ऑगस्ट रोजी घडली असून महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एज्ञात महिलेच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा औरंगाबाद येथील वैष्णवी कोंडपल्ले या दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी औरंगाबाद ते उस्मानाबाद असा एसटी बसने प्रवास करत होत्या. प्रवासात गेवराई ते कुंगशी फाटा दरम्यान वैष्णवी कोंडपल्ले यांच्या आसनाशेजारी बसलेल्या एका अनोळखी महिलेने वैष्णवी यांच्या पिशवीतील अंदाजे २ लाख ७६ हजार रूपये किंमतीचे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने वैष्णवी यांच्या नकळत चोरुन नेले. या प्रकरणी वैष्णवी कोंडपल्ले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ८ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या