26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबादेत लाच घेताना महिला कृषी पर्यवेक्षक जाळ्यात

उस्मानाबादेत लाच घेताना महिला कृषी पर्यवेक्षक जाळ्यात

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तुषार व ठिबक सिंचन संचाचे अनुदान मिळण्यासाठी शासनास ऑनलाईन अहवाल पाठविण्यासाठी ४ हजारांची मागणी करून २ हजार रुपये लाच घेताना महिला कृषी पर्यवेक्षक हिस रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अलका लिंबाजी सांगळे वय ४२ वर्षे, असे लाच घेतलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. ती तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कार्यरत आहे.

तक्रारदार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून ठिबक आणि तुषार सिंचन सेट मागील काही महिन्यापूर्वी घेतले होते. त्याचे अनुदान तक्रारदार यांना प्राप्त होते. तसेच तक्रारदार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने तुषार सिंचन सेट घेतला असून सदर कामाचे अनुदान मिळणेसाठी शासनास ऑनलाईन अहवाल पाठवण्यासाठी आणि तक्रारदार यांचे यापूर्वी केलेल्या कामाचे अहवाल सादर केले म्हणून आरोपी अलका लिंबाजी सांगळे वय ४२ वर्षे, कृषी पर्यवेक्षक ( वर्ग -३),

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांचेकडे ४००० रु. लाचेची मागणी करून तडजोडी अंती २००० रु. लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, औरंगाबाद परीक्षेत्र यांनी सर्व नागरिंकांना आवाहन केले की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या