37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeउस्मानाबादचिंताजनक बातमी : उस्मानाबादेत २४ तासात कोरोनाचे दोन बळी

चिंताजनक बातमी : उस्मानाबादेत २४ तासात कोरोनाचे दोन बळी

एकमत ऑनलाईन

उस्मानपुरा भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली : १०४ रुग्णांची कोरोनावर मात

उस्मानाबाद  : मागील 24 तासात उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून जिह्यासाठी ही चिंताजनक बातमी आहे. उस्मानाबाद शहरातील काका नगर येथील उस्मानपुरा भागातील 50 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह, हृदयविकार याचा पूर्वीपासूनच त्रास होता, त्यात कोरोनाची लागण झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल शनिवारी सायंकाळी शहरातील धारासूर मर्दिनी देवी परिसरातील एका कोरोना बाधित युवकाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. सदरील युवकास पूर्वीपासून कॅन्सरची बाधा असल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. त्यातच आज रविवारी सकाळी उस्मानाबाद शहरातील काका नगर भागातील उस्मानपुरा येथील एका 50 वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. सदरील पुरुषास नळदुर्ग येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर उस्मानपुरा भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली होती.

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 145 झाली असून यापैकी 104 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 36 रुग्णांवर जिह्यातील विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जिह्यातील कोरोना बळींची संख्या पाचवर गेली आहे.

Read More  आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा : एका दिवसात 311 कोरोना रुग्णांचा मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या