कळंब (सतीश टोणगे) : कळंब येथील डॉ.राजेंद्र बावळे हे रुग्ना ला उपचार करत करत,आधुनिक शेती,विष मुक्त शेती, या वर धडे देत आहेत.यशोगाथा विषमुक्त शेतीची. या वर ते जनजागरण मोहीम राबवत आहेत. तरुण शेतकरी विषमुक्त शेती कडे वळला पाहिजे या साठी ते सतत प्रयत्नशील असून त्यांना माणसांच्या डॉक्टर बरोबर शेतीचे डॉक्टर असे ही संबोधले जात आहे.आर एस जी एस.पुणे..अंतर्गत मराठवाडा विकसन प्रकल्प, जिल्हा उस्मानाबाद यशोगाथा अशा एका हरहुन्नरी..उत्साही..मेहनती..प्रेरणादायी..व्यक्तीमत्वाची व उच्च विद्याविभुषित..कळंब शहरातील नामांकित डाॕक्टर.. राजेंद्र बावळे यांची .जीवनाची नवी दिशा नवा मार्ग शोधून पेशंटची व समाजाची नाडी ओळखुन अचुक निदान अचुक औषध देणाऱ्या डाॕक्टरांची गाथा असून त्यांनी विष मुक्त शेती वर स्वतः भर दिला असून,येणाऱ्या रुग्णांना ही ही शेती करण्या साठी प्रोत्साहित करत आहेत.
शेतीतील सर्व प्रयोग आदरणीय पाळेकर गुरुजींच्या मार्गदर्शनानुसार ते करतात…यावर्षी “पंचस्तरीय-मिश्र फळबाग”अर्धा एकर केली आहे..यात केसरआंबा…सिताफळ….शेवगा….पेरु….नारळ…मोसंबी…अंजीर…व अंतरपिक म्हणून उडिद..कोथिंबीर घेतले..ड्रीप व्दारा पाणी देत असल्यामुळे ७०% पाणी वाचते..त्यासाठी एक विहिर आहे..पेरणीसाठी बियाणे ही घरचे वापरतात.व जीवामृत..गोमुञ..दशपर्णी..ते नियमित वापरतात..यासाठी त्यांच्या कडे..तीन गीर गायी व तीन कालवडी आहेत.. ते शेतीचा नियमित हिशेब लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने, शेती नफ्यात आहे की तोट्यात हे ही कळते..यात त्यांच्या भावाची..कुटुंबीयाची मोलाची साथ मिळत आहे..माझा डाॕक्टरकीचा पेशा सांभाळून मी स्वतः जातीने शेतीकामात लक्ष घालतो.असे ही डॉ.बावळे यांनी सांगितले.
विषमुक्त शेती चळवळ व्यापक करण्यासाठी मी माझ्या कडे येणाऱ्या पेशंटला प्रोत्साहित करतो..योगाचे धडे देतो..असंख्य शेतकरी या विषमुक्त शेतीकडे वळत आहेत..समाज निरोगी रहावा यासाठीच सेवा कारणी लागावी असे ही डॉ बावळे यांनी सांगून अनेक तरुणांनी हा प्रयोग करायला सुरुवात केली आहे..त्यांची शेती प हण्या साठी दूर वरून शेतकरी येत असून, त्यांना ते मार्गदर्शन करत आहेत.
!! सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ! सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्र्चित दुःखभाग् भवेत् का !!
आर.एस.जी.एस.संस्थेच्या विषमुक्त शेती चळवळी सोबत पाच वर्षा पासून ते जोडले आहेत. या मुळेच संस्थेच्या कार्याचा विस्तार सर्वांच्या प्रयत्नातुन गती घेत आहेत.