32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home उस्मानाबाद येडशी गाव पुन्हा लॉकडाउन

येडशी गाव पुन्हा लॉकडाउन

एकमत ऑनलाईन

येडशी: उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार १७ ते २९ आँगस्ट या काळात गावातील सर्व दुकाने बंद राहणार असून ऐन सणासुदीच्या तोंडावर बंदमुळे व्यापारी संघ मात्र नाराज आहे.

याबाबत उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय सुरवसे, ग्रामविकास अधिकारी संजय आडे,तलाठी बालाजी गरड यांनी गावात येणा-या मार्गावर गेट टाकून बंद केले आहे. दरम्यान सणासुदीच्या दिवसात व्यवसाय बंद होणार असल्याने व्यापाèयांचे मोठे नुकसान होणार आहे तसेच ऐन सणात व्यवसाय बंद असल्याने नागरिकाना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

तरी पूर्वी च्या वेळेत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी येथील व्यापारी संघाने निवेदनाद्वारे तहसीलदार गणेश माळी यांना केली. यावेळी तहसीलदार यांनी गावात कोरोणा रुग्न संख्या वाढत असल्याने प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला असे सांगून गाव कडेकोट बंद ठेवण्याच्या स्थानिक अधिका-यांना सुचना दिल्या.

दरम्यान शहाजी राजे चौकात गेट लावताना ग्रामस्थ व व्यापाèयांनी बंद काळात अनेक व्यवसाय सुरु असतात. त्यामुळे इमानदारीने व्यवसाय करणा-याना याचा त्रास होतो. सर्व व्यवसाय कडोकोट बंद करा अन्यथा गावातील दुकाने सुरु करा असे म्हणून बंद करण्यास विरोध केला यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करुन गेट लावण्यात आले.

यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी एस डी तायडे, विस्तार अधिकारी शंकर भांगे, मंडळ अधिकारी नागटिळक, सरपंच गोपाळ नागटिळक, उपसंरपच सुधीर सस्ते, पं.स.उपसभापती संजय लोखंडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय सस्ते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष समाधान पाटील, उपअध्यक्ष राजाभाऊ धावने नागरिक उपस्थित होते. गेल्या मार्च महिन्यापासुन दूकाने बंद असून आता पोळा व गौरी गणपती अशा सणावेळी दुकाने बंद करण्याच्या निर्णयान व्यापा-यांचे मोठे नुकसान होणार आहे तरी बंद चा निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी यावेळी व्यापा-यांनी केली. बंद काळात गावभर पोलिस बंदोबस्त नसल्याने चोरुन व्यवसाय करणाèयांची संख्या मोठी आहे. याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

कोरोनानंतर आता जनावरांवर लम्पी आजाराचे सावट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या