कळंब : तुम्हीच शिकवा, आणि शिका..काही अडचणी आल्यास अब्दुल माजीद काझी हे त्यांच्या समस्या सोडवतात,या मुळे विद्यार्थ्यांना शिकण्याची व शिकवण्याची सवय लागली आहे.
मस्सा ख येथील जी.प. शाळेत, मे महिन्याच्या सुट्टीत शाळेत इयत्ता सातवी( ५० विद्यार्थी) व आठवी (४० विद्यार्थी) असे दोन वर्गाला शिष्यवृत्ती चे वर्ग चालू आहेत. विद्यार्थी सुरुवातीला तासाला येतात परंतु हळूहळू कमी होत जातात.त्यांचा उत्साह कमी कमी होत जातो. अध्यापन केले की एक तास तेवढा वेळ ते लक्ष देतात परंतु काही मुलं दुर्लक्ष करतात. या कोरोना महामारी ने तर सर्वात जास्त शिक्षण क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवयच मोडली, म्हणून नेहमी त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड कशी निर्माण होईल याच्या साठी काझी सर प्रयत्न करत आहेत, कधी प्रेमाने कधी रागावुन कधी प्रेरणादायी गोष्ट सांगुन काही मुले अभ्यास करतात. वर्गातील सर्वच मुले अभ्यास कसं करतील व ते दिवसभर अभ्यासात कशी रमतील ह्या साठी सरांनी ठरवलं आपण अध्यापन करायचे नाही आणि काझी सर फळ्या पासून दूर झाले आणि विद्यार्थ्यांना सांगितले तुम्हीच शिकवायचे आणि तुम्हीच शिकायचे मी फक्त मार्गदर्शन करणार.
मुलांना काही तरी वेगळे वाटु लागले त्यांनी हातात पेन घेऊन फळ्यावर ते लिहु लागले इतर मुलांना समजावून सांगु ही लागले. प्रत्येक मुलांमध्ये आत्मविश्वास येवु लागला आणि ते सर्व एकमेकांच्या साह्याने शिकु लागली. आणि दिवसभर शाळेत शिकु लागली व शिकवु ही लागली व शाळेत ही रमली. समस्या असेल तरच सर तेवढे दुर करतात. या शाळेतील उपक्रम शील शिक्षक अब्दुल माजीद काझी जि. प.प्रशाला मस्सा खं, यांनी हा नवीन उपक्रम राबविल्यानी मुलांना शिकण्याची व शिकवण्याची आवड निर्माण झाली आहे. असा प्रयोग सर्व शाळांनी राबविण्यास हरकत नाही.