उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील गौर येथील विनोद सुरेश लंगडे (वय ३०) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दि. ५ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मयत विनोद लंगडे याने नेमकी कुठल्या कारणामुळे आत्महत्या झाली हे समजू न शकल्यामुळे येरमाळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
त्याच्या पार्थिवावर त्यांच्या शेतात गौर येथे दि.६ जुलै रोजी, सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. कर्ज बाजारीपणामुळे नैराश्यातून हे पाउल उचलले असावे, असे बोलले जात आहे.