23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादकोंबड्या चोरल्याच्या कारणावरून युवकाचा खून; एक आरोपी ताब्यात

कोंबड्या चोरल्याच्या कारणावरून युवकाचा खून; एक आरोपी ताब्यात

एकमत ऑनलाईन

ईट : भूम तालुक्यातील ईट येथील भोसले वस्ती (गायरान) येथे कोंबड्या चोरल्याच्या कारणावरून एका तरूणाचा खून झाला आहे. लोखंडी कुर्‍हाडीने वार करून त्याला संपविण्यात आले. ही घटना मंगळवारी दि. १६ ऑगस्ट रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. गारवा जाहिराती भोसले (३२) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खून प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील ईट येथील भोसले वस्तीवरील शाम जहाळ्या भोसले व घोडेगाव येथील सोन्या अक्षभा काळे हे दोघे १६ ऑगस्टच्या रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास गारवा भोसले याच्या घरी गेले. कोंबड्या चोरल्याची माहिती कोंबडी मालक व पोलिसांना देईल या भीतीने शाम भोसले व सोन्या काळे या दोघांनी गारवा भोसले याच्यावर झोपीमध्ये असताना कुर्‍हाडीने वार केले. या मारहाणीमध्ये गारवा भोसले ठार झाले.

मयत गारवा भोसले याच्याकडे राखण्यासाठी जो भाग (एरिया) आहे. त्या भागातील आकाश साहेबराव भोसले यांच्या कोंबड्याची चोरी झाली होती. या चोरीची माहिती कोंबडी मालक व पोलिसांनी देईल म्हणून गारवा भोसले याचा खून केला, अशी फिर्याद मयताची पत्नी शितल गारवा भोसले यांनी पोलीसात दिली. या फिर्यादीवरून कलम ३०२, ३४ भादंवी प्रमाणे वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, भूम उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक सुरेश दळवे, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका फंड, किशोर काळे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केलेली आहे. पोलिसांनी घटनेच्या तपासाची चक्रे जलद गतीने फिरवल्याने आरोपी शाम जहाळया भोसले यास ताब्यात घेतले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश दळवे हे करत आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या