23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeउस्मानाबादयेडशी येथे जीवघेणा हल्ला केल्याने तरूण गंभीर जखमी

येडशी येथे जीवघेणा हल्ला केल्याने तरूण गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे एका तरूणावर चौघांनी जीवघेणा हल्ला करून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधून पाण्यात फेकून दिले. ही घटना ८ ऑगस्ट रोजी येडशी येथील रामलींग उड्डानपुलाजवळ घडली. या प्रकरणी मारेकरी चौघांच्या विरोधात १२ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येडशी येथील प्रेम ठाकर हे ८ ऑगस्ट रोजी आपल्या घरात झोपलेले होते. त्यावेळी रोहित चंदनशिवे, आशितोष शिंदे, अजय शिंदे, तुषार ठाकर या चार आरोपींनी प्रेम ठाकर यांना घराबाहेर बोलावून घेतले.त्याला गावातील रामलिंग उड्डान पुलाखाली घेवून गेले. जुन्या वादाच्या कारणावरुन या चौघांनी प्रेम ठाकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, फायटर, लोखंडी गजाने मारहान करुन गंभीर जखमी केले. यावेळी तुषार ठाकर याने प्रेम याच्या गळ्याला तलवार लावून त्याचे हात-पाय दोरीने बांधून रस्त्याजवळील खड्ड्यातील पाण्यात टाकून दिले. या चौघांनी ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी प्रेम ठाकर यांच्या फिर्यादीवरून उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या