27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeउस्मानाबादकार्ला येथे जिल्हा परिषद शाळा बनली जुगाराचा अड्डा

कार्ला येथे जिल्हा परिषद शाळा बनली जुगाराचा अड्डा

एकमत ऑनलाईन

जेकटेवाडी : परंडा तालुक्यातील कार्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शालेय शिक्षण समिती व शिक्षकांच्या दुर्लक्षपणामुळे शाळा जुगारड्यांचा अड्डा बनली आहे. शाळेतील वर्ग खोल्यामध्ये पिचका-या मारुन भिंती रंगवल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे धाव घेत निवेदन दिले आहे.

यामध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे काही वर्ग खोल्यांना जुगार अडुयाचे रूप येऊन जुगा-यांनी गुटखा खाऊन भिंती रंगविल्या आहेत, शालेय शिक्षण समिती व शिक्षकांचे शाळेकडे दुर्लक्ष असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. ज्या शाळेला विद्यामंदिर म्हणुन पाहिले जाते. त्या शाळेला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विद्या मंदीरात असे प्रकार घडत असतील तर विद्यार्थांनी काय आदर्श घ्यावा. शाळेत ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती असताना असे प्रकार घडतात कसे? त्याचप्रमाणे शालेय शिक्षण समितीचे शाळेकडे लक्ष असते तर असे प्रकार घडले नसते, असा प्रश्न तेथील सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

गावातील जे जुगारी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे. निवदेवनावर कैलास झिरपे, किशोर झिरपे, योगेश झिरपे, गणेश वरपे, धर्मराज झिरपे बापु भुजे, दौलत शिंदे, भरत राऊत आदीसह गावातील ५५ नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत. तसेच गावातील जुगा-यांनी शाळेत प्रवेश केला कसा व थुकुंन गहाण केली याची चौकशी करावी. व गट शिक्षणाधिकारी शिक्षकांवर कारवाई करणार का याकडे कार्लावासीयांचे लक्ष वेधले आहे.

पीक कर्जाच्या वसुलीस ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या