मुंबई : प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या व्हिडिओला अवघ्या काही वेळात ४८ लाखांहून अधिक व्हयूज मिळाले.
राज ठाकरे म्हणाले की, आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जात असताना राज्यातील खासदार-आमदार गप्प का? असा संतप्त सवाल विचारत त्यांनी सत्तेसमोर सरेंडर होणा-या राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉक्युमेंट्री डिलीट केली तरी देशाच्या प्रबोधनासाठी ला लावलेली ठिणगी आता वणवा बनली असून एकाधिकारशाहीविरोधातील लढा यापुढेही कायम राहील.
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसे घातले जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्हयूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व् ूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व् ूज याची मोजदादच नाही, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
मुंबई पोलिसांच्या विनंतीचा मान राखतोय
राज ठाकरे म्हणाले की, पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपले गुपित फुटले याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होते. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलिस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी. मला आलेली विनंती ही मुंबई पोलिस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलिस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
..जी आग लागायची ती लागली
राज ठाकरे म्हणाले की, ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे.
















