27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीअत्याधुनिक स्टेडियमची उभारणी करणार : आ. डॉ. राहुल पाटील

अत्याधुनिक स्टेडियमची उभारणी करणार : आ. डॉ. राहुल पाटील

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी जिल्ह्यात विविध खेळांमध्ये गुणवंत खेळाडू घडले आहेत. परभणीत क्रिडाचे हब व्हावे यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याच पार्श्वभूमीवर विद्यापीठात अत्याधुनिक अशा स्टेडियमची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी विद्यापीठाची २५ एकर जमीन मिळाली असून शासनाकडून १५ कोटी रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असल्याचे आ. डॉÞ राहुल पाटील यांनी सांगितलेÞ

भारतीय बॅडंिमटन असोसिएशन तर्फे घेण्यात येणा-या पश्चिम विभागीय आंतररांिज्यय बॅडंिमटन अंिजक्य स्पर्धा जिल्हा बॅडंिमटन हॉल येथील बॅडंिमटन कोर्टवर घेण्यात येत आहेÞ या स्पर्धेचे शानदार उदघाटन करण्यात आलेÞ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. सुरेशराव वरपुडकर हे तर उदघाटक आ. डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि, जिÞपÞचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक सुदर्शन मम्मुका, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, भारतीय बॅडंिमटन असोसिशनचे सहसचिव मयूर जी पारिख, अनिल चौगुले, सहअध्यक्ष प्रदीपजी गंधे, सचिव सुंदर जी शेट्टी, उपाध्यक्ष आशिष जी वाजपेयी, आंतरराष्ट्रीय खेळाडू ऋतुपर्ण कुलकर्णी मंगरीष पालेकर, पंचप्रमुख सतीश माल्या, गोवा सचिव संदीप हेगडे, एडवोकेट दीपक देशमुख, श्रीकांत साखरे, नागोजीचिंतलवार, योनेक्स प्रतिनिधी बालकिशन चौधरी, धनंजय देशमुख श्री पाटील, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले की, सध्या आयटीचे युग आहेÞ मात्र या क्षेत्रात काम करताना खेळही महत्वाचा आहेÞ परभणी येथील बॅडमिंटनसाठी असलेले कोर्ट हे अपुरे असुन आणखी आठ कोर्ट उभारणी करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोतÞ तसेच विविध खेळ प्रकारासाठी विद्यापीठात अत्याधुनिक अशा स्टेडियमची उभारणी केली जाणार असुन त्यासाठी विद्यापीठाने २५ एकर जमीन दिली आहे. तसेच यासाठी १५ कोटी रूपयांच्या निधीची मागणीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात आÞसुरेशराव वरपुडकर म्हणाले की, परभणीतुन अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचले आहेÞ खेळाडूंना पुरविण्यात येणा-या सुविधाचा अभाव असला तरी खेळाडूमधील जिद्द महत्वाची आहेÞ काही दिवसापुर्वीच आपण ऑल इंडियाचे कब्बडी स्पर्धेचे आयोजन केले होते मात्र कोरोना संसर्गामुळे ह्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्याचे ते म्हणालेÞ पुढे ते म्हणाले की, बॅडंिमटन कोर्टची देखभाल महत्वाची आहेÞ यासाठी जिल्हा संघटनेकडेच याची जबाबदारी दिली पाहिजेÞ यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू असेही ते म्हणाले.

यावेळी कुलगुरू डॉÞ इंद्र मणि, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, जिल्हा बॅडंिमटनचे अध्यक्ष विजय जामकर यांनी मनोगत व्यक्त केलेÞ सुत्रसंचालन प्रा डॉ सुनिल मोडक यांनी केलेÞ प्रस्ताविक सचिव रंिवद्र देशमुख पतंगे यांनी केलेÞ तर आभार उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे यांनी मानलेÞ

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या