26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeपरभणीआ. दुर्रानींचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

आ. दुर्रानींचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत गटबाजीतून आ.बाबाजानी दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुंकांपासून गटबाजी समोर येत होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी दौ-यावर आले असताना गंगाखेड येथे पदाधिका-यांनी जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. यानंतर आ.दुर्रानी यांनी माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर परत एकदा गटबाजी समोर येवू लागली. यानंतर परभणी शहर जिल्हाध्यक्षपदी माजी महापौर प्रताप देशमुख यांची वर्णी लागल्यानंतर आ.दुर्रानी दुखावले गेले होते.

त्यांचे खंदे समर्थक असलेले प्रा.किरण सोनटक्के यांना ग्रामिण कार्याध्यक्षपदाची धुरा दिली होती. सोनपेठचे गटनेते चंद्रकांत राठोड यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्यावेळी जिल्हाध्यक्षांना डावलण्यात आले होते. यामुळे आ.दुर्रानी चांगलेच दुखाव्लो होते. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीला कंटाळून बुधवार, दि.२४ रोजी आ.दुर्रानी यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या राजीनाम्यानंतर लवकरच प्रसार माध्यमांशी बोलणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान आ.दुर्रानी यांच्या राजीनाम्यानंतर नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर यांची वर्णी लागणार असल्याची शक्यता राष्ट्रवादीतून वर्तविली जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या