22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeपरभणीईडी कारवाईच्या विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

ईडी कारवाईच्या विरोधात काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

एकमत ऑनलाईन

जिंतूर : केंद्रातील भाजपा सरकारने केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांना ई.डी. कार्यालयात दि. २६ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे. या विरोधात तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात ईडी कारवाई थांबवण्यात न आल्यास काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

तहसीलदार यांना निवेदन देताना काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेशराव काजळे, जि.प. सदस्य अविनाश काळे, म.प्र.काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी केशवराव बुधवंत, जिंतूर सेलू विधानसभा अध्यक्ष रामजी घुगे, तालुका उपाध्यक्ष कृष्णा राऊत, तालुका संघटक इर्शाद पाशा चांद पाशा, महेश सांगळे, बाळासाहेब फाटे, सिताराम चांदणे, उपसरपंच पांगरी, उमाजी साखरे, कामीटे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या