22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर बसवले

ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर बसवले

एकमत ऑनलाईन

पाथरी: रात्रीच्या अंधारात दुचाकी आणि इतर वाहनांना ऊस वाहतुक करणा-या वाहनां मुळे धोका निर्माण होऊ नये या साठी ऊसाची वाहतुक करणा-या वाहनांना शनिवार २७ नोव्हेंबर रोजी योगेश्वरी शुगर्स च्या यार्डात आरटी धोंडीबा ढगे आणि सहका-यांच्या उपस्थितीत पाठी मागुन रिफ्लेक्टर लावण्यात आले.

योगेश्वरी शुगर्सचे चेअरमन आर टी देशमुख यांच्या मार्गदर्शनात या साखर कारखाण्याचे कार्यकारी संचालक अ‍ॅड रोहित आर देशमुख यांच्या नेतृत्वात ऊस वाहतुक करणारे ट्रक,ट्रॅक्टर व टायरगाडी वाहतुक करणा-या वाहनांना इतर वाहनांच्या सुरक्षितते साठी परभणीचे सह वाहन निरिक्षक धोंडीबा ढगे,ज्ञानेश्वर कांबळे,चारुशिला फुलपगार यांनी रेडीयम रिफ्लेक्टर लावले.या वेळी अधिका-यांनी रिफ्लेक्टर लावण्याचे नेमके फायदे काय याचे महत्व अगदी साध्या भाषेत उपस्थितांना समजाऊन सांगितले. टायरगाडीला बैल असतात त्यांची काळजी आपणच घ्यावी लागते त्या मुळे बैलांच्या शिंगांना रिफ्लेक्टर असने गरजेचे असल्याचे ही सह वाहन निरिक्षक ढगे यांनी सांगितले.

या वेळी वाहतुक नियमांचे आम्ही सर्वजन पालन करून कुठली ही हानी न होऊ देण्या साठी संपुर्ण हंगामभर प्रयत्न करू असे उपस्थित वाहन चालकांनी सह वाहन निरिक्षकांना आश्वासन दिले. तत्पुरी सर्व अधिका-यांचा योगेश्वरी शुगर्स च्या वतीने शाल,श्रीफळ,पुप्षहार देउन चेअरमन आर टी देशमुख यांनी कार्यालयात सत्कार केला या वेळी कार्यकारी संचालक अ‍ॅड रोहित आर देशमुख,मुख्य शेतकी अधिकारी देविदास मोकाशे,कार्यालय प्रमुख राजकुमारसिंग तौर,मुख्यलेखापाल रोडगे,केनयार्ड सुपरवाझर जाधव,मोहन देशमुख,टाईमकीपर रामराव कदम,वसुली अधिकारी संजय महाजन,सुरेश गिराम,राम गिराम आदी अधिकारी कर्मचारी यांची या वेळी उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या