24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीऔरंगाबाद-हैदराबाद रेल्वेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न

औरंगाबाद-हैदराबाद रेल्वेवर धाडसी दरोड्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

सेलू : सेलू रेल्वेस्थानक जवळ असलेल्या वैतागवाडी परीसरात औरंगाबाद- हैद्राबाद रेल्वेवर दरोडेखोरांनी दोन्ही बाजूंनी हल्ला केल्याची घटना गुरूवार, दि.२५ रोजी घडली. या घटनेत दरोडेखोरांनी रेल्वेच्या दारात उभा असलेल्या प्रवाशांच्या हातावर लाकडाने मारहान करीत मोबाईल व पर्स पळवल्या. या घटनेत विद्यार्थ्यासह प्रवाशी जखमी झाले आहेत. दरम्यान गुन्हा दाखल करण्यासाठी सेलू व परभणी रेल्वेस्थानकांनी नकार दाखवल्यानंतर प्रवाशी आक्रमक झाले होते. त्यानंतर औरंगाबादच्या रेल्वे सुरक्षा बलाने सेलूत येवून आज पंचनामा करीत गुन्हा नोंद केला.

सेलू स्टेशन जवळच असलेल्या वैतागवाडी परिसरात औरंगाबाद- हैद्राबाद गाडी क्रमांक १७६५० या गाडीवर दरोडेखोरांनी दोन्ही बाजूनी हल्ला करत दरवाज्याजवळ असलेल्या लोकांचे मोबाईल, पर्स हातावर लाकडाने मारहाण करत पळवले. या घटनेत इरळद तालुका मानवत येथून शिक्षणासाठी सेलू येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात येणारा विद्यार्थी संतोष रमेश गायके झटापटीत रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झाला. तसेच अनेक प्रवासी मारहाणीत जखमी झाले आहेत. सदरील जखमी विद्यार्थ्यास डोक्यास मार असल्याने परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सेलूतील रेल्वे प्रवाशी सुरक्षा वा-यावर असून स्थानिक रेल्वे पोलीस व रेल्वे पोलीस यांनी सदरील गुन्हा नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली.

सदरील प्रवाशांनी परभणी येथे तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी घटना सेलू येथे झाली आहे तिथे फिर्याद नोंद करा असे सांगितले. सदरील स्टेशन मास्टर यांनी मला गार्डने मेमो दिला नाही त्यामुळे मी काही करू शकत नाही असे सांगितले. दरम्यान घटनेच्या दोन दिवसा नंतर शनिवार, दि.२७ रोजी औरंगाबाद येथील रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी यांनी येऊन पंचनामा केला व समर्थ चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार भा .द वी कलम ३९४ व ३४ नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या