परभणी : शहरातील परभणी- ताडकळस रस्त्यावरील कोकनट लगुन ऍग्रो रिसोर्ट येथे होळीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने रंगोत्सव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या रंगोत्सवात लाईव्ह डी.जे., खेळ, मनोरंजनासह स्वादिष्ट भोजनाची मेजवानी खवय्यासाठी ठेवण्यात आली आहे. या रंगोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन रिसोर्टचे संचालक दिपक तलरेजा यांनी केले आहे. दररोजच्या धवपळीतून थोडासा विरंगुळा मिळावा व पर्यटनाचा आनंदही घेता यावा यासाठी शहराच्या लगतच ताडकळस रस्त्यावर कोकनट लगुन ऍग्रो रिसॉर्ट थाटण्यात आले आहे. या रिसोर्टला अल्पावधीतच परभणीकरांनी पसंदी दिली आहे. ग्राहकांचा होळीचा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने स्पेशल रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात ढोल, पावसातील नृत्य, किडस झोन, बलून फाईट, ऍग्रोनिक कलर, अनलिमिटेड फुड, लाईव्ह डिजे, रंगोत्सव, शितपेय, कपल गेम, लाईव्ह सिगींग, वसुदेव नृत्य, हॉर्स रायडींग, क्लकक्लाट राईड, कॅमल राईड आदी मनोरंजनात्म खेळांचा समावेश आहे. याच बरोबर स्वादिष्ट व रूचकर भोजन अनलिमिटेड असणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ वाजे पर्यंत ब्रेकफास्ट, दुपारी १२ वाजता ऑरेंज ज्यूस, जलजीरा, ग्रीन गार्डन ज्यूस, आईस कोल्ड, डिर्जटमध्ये ड्रायफुटस, दुपारी १.३० ते ०३ वाजेदरम्यान मीनी पिज्जा, बटर पापडी, चाट, बंजारा मंच्युरीयन, भाजवडा, दुपारी ३.३० वाजता जेवनात दालबाटी, व्हेज मालवानी, पनीर बटर मसाला, लाईव्ह फलका, स्टीम बासमती राईस आदी पदार्थांचा आस्वाद खवय्याना घेता येणार आहे.
होळीच्या पार्श्वभुमीवर ग्राहकांसाठी विशेष ऑफर म्हणून केवळ ८००० रूपयांमध्ये पूर्णवेळ पर्यटन, मनोरंजन खेळांसह स्वादिष्ट व रूचकर जेवणाचा आस्वाद घेता येणार आहे. खास होळीचे औचित्य साधून ही आकर्ष ऑफर ठेवण्यात आली असून याचा ग्राहकांनी मनमुराद लाभ घ्यावा, असे आवाहन कोकनट लगून ऍग्रो रिसॉर्टचे स ंचालक दिपक तलरेजा यांनी केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने महिला, पुरूष संरक्षक, पार्किंग व्यवस्था त्याच प्रमाणे येण्याजाण्याची सुविधा देखील ठेवण्यात आली आहे. कुटुंबासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सदरील रिसॉर्ट हे केवळ शुध्द शाकाहारी असून या ठिकाणी मद्यपान करण्यास सक्त मनाई असल्याचे रिसोर्टचे संचालक दिपक तलरेजा यांनी माहिती दिली आहे.