22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeपरभणीकौसडीत सर्पदशांने एकाचा मृत्यू

कौसडीत सर्पदशांने एकाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

कौसडी : येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे काल रात्री एक मृतदेह सापडला होता. या प्रकरणी डॉक्टरांनी मृत व्यक्तीची तपासणी करून संबंधिताचा मृत्यू सर्पदंशाने झाले असल्याचे सांगितले. कौसडी येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या दर्गा रस्त्यावर एका शेतक-याला दि.२५ रोजी रात्रीच सुमारास एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आला. शेतक-याने याची माहिती बोरी पोलीस ठाण्यात दिली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे यांनी कर्मचारी सय्यद रफीक, बद्रीनाथ कंठाळे, तूपसुंदर यांच्यासह घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीची ओळख पटवली. मृत व्यक्ती कौसडी येथील बसवेश्वर नगर मधील हरिभाऊ अंभोरे असल्याचे समजले. हरिभाऊ अंभोरे यांच्या घरातील व्यक्तींना बोलवून मृतदेह बोरी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केल्यानंतर मृत व्यक्तीच्या पायाला सर्पदंश झाल्याचे सांगितले. मृत व्यक्तीचे नातेवाईक नाशिक येथून येत असल्याने दि.२६ ऑगस्ट रोजी मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आला. बोरी पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद झाली आहे. हरिभाऊ अंभोरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले, भाऊ, भाऊजई असा परिवार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या