चारठाणा : येथील मागिल पंधरा ते विस वर्षा पासूनचा बसस्थानक ते देशमुख मेडिकल दरम्यानचा मुख्य रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे़ जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधेतुन ७ लक्ष रुपये खर्च करून हा सिमेंट रस्त्या बनवण्यात येत आहे़ याचे भुमिपुजन दि.२५ नोव्हेंबर रोजी येथील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.
चारठाणा हे मोठी बाजार पेठ म्हणुन ओळखले जाते़ तसेच पुरातत्त्व मंदिरांचा वारसा असल्याने येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते़ येथिल बसस्थानक ते देशमुख मेडिकल दरम्यानचा मुख्य रस्त्याचा प्रश्न मागच्या पंधरा ते विस वर्षा पासून रखडला होता़ अनेक वेळा पुढारी आले, गेले़ निवडणुका आल्या- गेल्या़ अनेक आश्वासने दिले परंतु रोड जशास तसाच होता़ अखेर रस्त्याला नानासाहेब राऊत यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधेतुन ७ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून हा सिमेंट रस्ता बनवण्यात येत आहे़ याचे भुमिपुजन येथील जेष्ठ नागरिक भाऊराव चिंचणे, शेख ईस्राईल भाई, रहिमखॉ पठाण, सरपंच अनिरुद्ध चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले़
या रस्ता कामाच्या भुमिपूजन प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्यअध्यक्ष नानासाहेब राऊत, उपसरपंच वाजेद कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य स.रहमत आली, नाना निकाळजे, सलाम इनामदार, माजी उपसरपंच तहेसीन देशमुख, खाजामीय देशमुख, हाजी चांदपाशा, पाशा बेग, जलालखा पठाण, नासर वली शाह, राजु काझी, बबनराव भवरे, शे.बाबा, शेख सिध्दीक, स.कासम आली, डॉ़जयकांत हाके, पं.स.अभियंता चव्हाण, शे.आरेफ, जनार्धन साळवे, हम्माद देशमुख, शे.कलिम, शे.ईसाकोद्दीन, दडके टेलर, शे. आसेफ, फिरदोस पठाण, सईद काझी, अ.सत्तार, सलिम हवालदार, शे.हसन, आजु पठाण आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.