परभणी : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या ओळी प्रमाणे आजच्या घडीला जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे
. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मंगळवार, दि.२१ मार्च रोजी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून परभणी वनविभाग व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आरटीओ कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी वनविभागाचे विभागीय वन अधिकारी अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी रुषिकेश चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे, वनपाल काशिनाथ भंडारी, वनरक्षक गणेश करे, वनरक्षक शेख निलोफर, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अश्विनी स्वामी,
मोटार वाहन निरीक्षक अभिजित तरकसे, जयेश देवरे, धोंडिबा ढगे, चारुशीला फुलपगार, प्रशांत मोरे, क-हाळे, टाक, सुनील सवंडकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. जागतिक वन दिनाच्या निमित्ताने सर्व नागरिकांसाठी वसुंधरेचे हिरवे सोने वाढवा, वने वाचवा असा संदेशही देण्यात आला.