24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeपरभणीजिंतूर- औंढा रस्ता कामासाठी रास्तारोको आंदोलन

जिंतूर- औंढा रस्ता कामासाठी रास्तारोको आंदोलन

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जिंतूर- औंढा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासह आडगाव सर्कल अंतर्गत येणा-या विविध गावातील रस्त्याच्या समस्या सोडवण्यासह लोडशेडिंगमुळे,अग्रमी विमा रक्कम व इतर विविध प्रश्नांवर शेतक-यांची होणारी हेळसांड थांबविण्याच्या मागणीसाठी आंडगाव बाजार सर्कलच्या मा.जि.प.सदस्य आरुणा काळे यांच्या नेतृत्वाखालील परिसरातील नागरिकांनी आडगाव फाटा येथे शनिवार, दि़१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले़ यावेळी राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी व विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी लेखी आश्वासन देऊन काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सांगीतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़.

मागील काही दिवसांपासून जिंतूर- औंढा महामार्ग रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही़ या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊन अपघातात कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे. तसेच आडगाव परिसरातील महावितरण सबस्टेशनचे ट्रान्सफार्मर, भुसकवडी फाटा ते भुसकवडी रस्ता, ईटोली मांडावा, डोंगराळा घेवडा येथील विज वितरणाचा अतिरिक्तभार विभाजन करून मंजूर झालेले फिडर बसविण्यात यावे, ईटोली दाभा डीग्रस फिडर तत्काळ सुरू करणे यासह इतर विविध मागण्यासंदर्भात माजी जि.प.सदस्य अरुणा काळे यांच्या नेतृत्वाखालील रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी परिसरातील शेतक-यांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़.

यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या नागरीकांनी दोन तास रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ या आंदोलनात काँग्रेस पक्षाचे नानासाहेब राऊत,अविनाश काळे, माजी सरपंच जगन्नाथ काळे, महेश सांगळे, राम घुगे, पवन भालेराव, महेश सांगळे, तहेसिन देशमुख, माऊली नागरे, निवास घुगे, गोविंद खंडागळे, बालाजी खंडागळे, मिलिंद डोके, नाना निकाळजे, बाबाराव चिलगर, मारुती घुगे, विश्वनाथ घुगे, शिवाजी काळे, विष्णू काळे, रहीम कुरेशी, सचिन कुटे, विकास शिंदे, नितीन पाटील व पुप्पु पाटील, रखमाजी खिल्लारे, रुक्मिणीबाई ईंगोले, रामकिसन नागरे, बबनराव कवडे, बाबुराव शेळके, कैलास कवडे, श्रावण खिल्लारे, जयकुमार खिल्लारे, बाळू खंडागळे, प्रकाश राऊत आदींसह आडगाव बाजार, दाभा, डीग्रस, घेवंडा, इटोली, टाकळ,खोपा, सोरजा, चितनरवाडी, भुसकवडी आदी गावातील शेतक-यांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या़ यावेळी बोरी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक मुळे, पीएसआय खोले, पतंगे, सुलोचना गाडेकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस जिया पठाण यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या