24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीजिल्ह्यात ३१५ नवे रुग्ण

जिल्ह्यात ३१५ नवे रुग्ण

एकमत ऑनलाईन

परभणी: परभणी जिल्ह्यात नुतन वर्षाच्या सुरूवातीपासूनच रूग्ण संख्या झपाट्याने वाढत असून शनिवारी नव्याने ३१५ रूग्ण आढळून आले आहेत. तर सध्या रूग्णालयात १ हजार ८२८ रूग्ण उपचार घेत आहेत.

परभणी जिल्ह्यात दोन महिन्यापुर्वी कोरोनाचा प्रादुर्भात मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण पसरले होते. मात्र नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच परत दिवसेंदिवस रूग्ण संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसापुर्वी केवळ २० ते २२ रूग्ण उपचार घेत होते तर सध्या हीच संख्या १ हजार ८२८ वर पोहचली आहे.शनिवारी जिल्ह्याभरात ३ हजार ४९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात ३१५ नागरिक कोरोना बाधीत आढळून आले आहे. सध्या रूग्णालयात १ हजार ८२८ रूग्ण उपचार घेत असून आज ७३ जणांना उपचारानंतर सुटटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार ७४५ रूग्ण आढळून आले असून उपचारानंतर ५० हजार ६१८ रूग्णांना सुट्टी देण्यात आली तर दुर्देवाने उपचार सुरू असतांना १ हजार २९९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान गेल्या गेल्या काही दिवसापासून दररोज रूग्ण संख्या ३०० च्या वर वाढतांना दिसत आहे.बुधवार दि. १९ जानेवारी रोजी २३५, गुरूवार दि. २० रोजी २३२ तर शुक्रवार दि. २१ रोजी ३७३ वर रूग्ण आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विविध उपाय योजना राबविल्या आहेत. बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी करू नये, सामाजिक अंतर ठेवूनच व्यवहार करावेत, वेळोवेळी हात धुवावेत असे आवाहन केले आहे. मात्र या आवाहनाला नागरिकांतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने रूग्ण संख्या वाढतांना दिसत आहे. नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या