24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीजीवनात यशस्वी होण्यासाठी इतिहास माहीत असावा लागतो

जीवनात यशस्वी होण्यासाठी इतिहास माहीत असावा लागतो

एकमत ऑनलाईन

पूर्णा : माणसाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर समाज संस्कृती सोबतच इतिहासाची माहिती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे प्र-कुलगुरु जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी केले.

येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या इतिहास विषयाच्या बी.ए.तृतीय वषार्साठी नेमलेल्या नवीन अभ्यासक्रमावरील कार्यशाळेत उदघाटक प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव प्रा.डॉ.रामेश्वर पवार होते. प्रमुख अतिथी प्रा.डॉ.अजय टेंगसे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ.धर्मराज वीर, डॉ.सदाशिव दंदे, डॉ.रामभाऊ मुटकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.बिसेन म्हणाले की, भारतीय शिक्षण संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ असून तिची ओळख विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. तसेच इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमातून रोजगार व नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतील याकडेही अभ्यास मंडळाने लक्ष दिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख अतिथी प्रा.डॉ.अजय टेंगसे यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि अभ्यास मंडळाचे कार्य यावर प्रकाश टाकला तर प्रा.डॉ. धर्मराज वीर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ संतोष कु-हे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी तर आभार कार्यशाळेच्या संयोजक प्रा.डॉ. शारदा बंडे यांनी मानले. याप्रसंगी विचार मंचावर इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉं.सदाशिव दंदे, सदस्य प्रा.डॉ. रामभाऊ मुटकुळे, समन्वयक डॉ. भिमराव मानकरे आदी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कु-हे, इतिहास विभाग प्रमुख डॉ.शारदा बंडे, समन्वयक डॉ.भिमराव मानकरे तसेच प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या