22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeपरभणीजीवे मारण्याची धमकी; दोन आरोपींना पकडले

जीवे मारण्याची धमकी; दोन आरोपींना पकडले

एकमत ऑनलाईन

परभणी : सेलू येथील एका अल्पवयीन मुलीसह तिच्या अल्पवयीन भावास जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती़ या प्रकरणातील दोन आरोपींना बुधवार, दि़ ७ सप्टेंबर रोजी परभणी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ गुन्हा दाखल झाल्यानंतर ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना हे यश मिळाले आहे.

या घटनेतील पिडीत मुलगी व तीचा मावस भाऊ हे त्यांचे शेतातून महालक्ष्मी सणानिमीत्त हराळी गवत सेलू येथे घेवून जात असतंना सेलू शहरालगतच्या परिसरातील खानीचे मारोती मंदीर दर्शन करून बसली असतांना दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी पिडीत मुलगी व तीच्या मावस भावास जिवे मारण्याची धमकी देवून दुचाकीवर बसवले. त्यानंतर आरोपींनी दोघांना बोरी परिसराकडे नेले़ त्यानंतर मुलीवर अत्याचार केला होता़ या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या