19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeपरभणीजुन्या भांडणातून शेजारच्या महिलांनीच केला चिमुकल्याचा खून

जुन्या भांडणातून शेजारच्या महिलांनीच केला चिमुकल्याचा खून

एकमत ऑनलाईन

पूर्णा : तालुक्यातील ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेपत्ता तीन वर्षीय बालकाच्या अपरहणाचा शोध लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. जुन्या भांडणावरून शेजारच्या महिलांनीच अपहरण करून बालकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेतील आरोपी महिलांच्या घरातील फरशी खालून प्रेत काढून पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी दोन्ही महिलांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन ताडकळस पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, या अपहरण प्रकरणात दि.१३ जानेवारी रोजी गणेश भिमराव धोत्रे (रा.सिध्देश्वर कळगाव परिसर ता. पुर्णा) यांनी ताडकळस पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती. यात नमुद करण्यात आले होते की, त्यांची पत्नी शेतातून परत येत असताना त्यांचा मुलगा गोविंद गणेश धोत्रे (वय ३ वर्षे) याचे कुणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले.

या गुन्ह्याची संवेदनशिलता ओळखून पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी चार पथके नेमण्याचे आदेश दिले. यात अप्पर पोलिस अधिक्षक यशंवत काळे, स्था.गु.शा.चे प्रभारी अधिकारी वंसत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.व्यंकट कुसमे, पोउपनि़साईनाथ पुयड, पोलिस अंमलदार बालासाहेब तुपसुंदरे, राहुल परसोडे, सय्यद मोबीन, जयश्री आव्हाड, दिलावर खान पठाण, सिध्देश्वर चाटे, राम पौळ, रफीक, अनिल कोनगुलवार, नामदेव डुबे, पिराजी निळे (सर्व नेमणुक स्था.गु. शा. परभणी) यांचे पथक नेमण्यात येऊन सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांच्या मदतीने अपहृत बालक व आरोपींचा शोध घेण्यात येत होता.

ताडकळस हद्दीत शोध घेत असताना पोलिसांना अपहृत बालकास त्यांच्या शेजारी राहणारी कावेरी गजानन बनगर हिने उचलून नेवून ठार मारुन पुरले असल्याचे समजले. त्यानंतर संशयित महिलेस ताडकळस पोलिस ठाणे येथे बोलाऊन अपहृत बालकाबाबत विचारपुस केली असता तिने जुन्या भांडणाचा राग मनात धरून बदला घेण्याच्या उददेशाने आमच्या अंगणात हा बालक खेळत असताना त्यास उचलुन घेवुन आमच्या घरात नेले व सासुने आणि मी त्यास जिवे ठार मारुन स्वत:च्या घरामध्ये कोप-यात पुरले असल्याचे सांगितले.

तहसीलदार यांच्या उपस्थितीत बालकाचे प्रेत घरातील फरशी खालून बाहेर काढण्यात येऊन पंचनामा करण्यात आला. तसेच गुन्हयातील महिला आरोपी कावेरी बनगर व तिची सासु न्नपुर्णा बालासाहेब बनगर (दोन्ही रा. सिध्देश्वर नगर कळगाव ता. पुर्णा जि.परभणी) यांना ताडकळस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़ गुन्हयाचा तपास सपोनि.विजय रामोड करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या