जिंतूर : येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मशाल रॅलीचे आगमन झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रॅलीचे स्वागत केले.
रॅलीचे आगमन होताच महाविद्यालयाचा परिसर जयहिंद, वंदे मातरम, भारत माता की जय या घोषणांनी निनादून गेला होता.
त्यानंतर सदरील मशाल प्राचार्य डॉÞश्रीधर भोंबे यांनी घेऊन महाविद्यालयात आणली. यावेळी दुतर्फा उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत रॅलीचे स्वागत केले.
सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मशाल रॅलीचे समन्वयक प्रा.डॉ.जयंत बोबडे, प्रा.डॉ.प्रल्हाद भोपे, प्रा
डॉ.सचिन खडके, प्रा.डॉ.दिगंबर रोडे यांनी रॅलीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. रॅली सोबत आलेल्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंर्त्यवीरांचे चित्र प्रदर्शन विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आयोजित केले होते.