झरी : येथे हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणीस शिबीरात डॉ.वृषाली कुलकर्णी, नेत्र चिकित्सा अधिकारी बीÞएमÞबायस, ज्ञानेश्वर देशमुख, डॉ.प्रल्हाद जाधव, मोरे एस.जी यांनी जवळपास ७०० रुग्णांची तपासणी केली. या पैकी ९५ रुग्णाचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याकरीता निवड करण्यात आली.
नेत्र तपासणी शिबिरापुर्वी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या प्रसंगी शिवसेना नेते गजाननराव देशमुख, सरपंच दिपकराव देशमुख, उपतालकाप्रमुख महेश महाराज, जिÞपÞसदस्य दिनेश बोबडे, जलालपुर सरपंच संदिप टेकाळे,
माजी सरपंच संतोष जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष ब्रम्हानंद सावंत, शाखा प्रमुख आबासाहेब चौधरी, शक्ती सावंत, अभिजित देशमुख, दिनेश बीरगड, ग्रामपंचायत सदस्य अशोकराव चोरमले, सुनील देशमुख, लिंबाजी अंबुरे, गजानन हेंडगे, दत्तराव जगाडे, किशोर देशमुख, संतोष देशमुख, गोंिवद जगाडे, सुरेश अण्णा देशमुख, सत्तार कुरेशी, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब जगाडे, अनिस इनामदार, रणजित परिहार, विशाल देशमुख, परमानंद करंजकर, युवा नेते योगेश शिरडकर, तात्या अंबूरे, ऋषिकेश लबडे आदीसह झरी ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिकांनी परिश्रम घेतले.