25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeपरभणीतहसीलदारांना आवरला नाही डान्स करण्याचा मोह

तहसीलदारांना आवरला नाही डान्स करण्याचा मोह

एकमत ऑनलाईन

जिंतूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गुरूवारी निघालेल्या मिरवणुकीत तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांना डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. सोशल मिडीयावर तहसीलदारांच्या नृत्याची स्तुती होत आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी पहाटेपासून सायंकाळी उशिरापर्यंत जिंतूर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याकरिता हजारो नागरिकांची गर्दी उसळली होती. रिपब्लिकन सेना तालुका शाखेच्या वतीने जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली. जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार जिंतूर सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड यांची विशेष उपस्थिती होती.

विशेष म्हणजे या जयंतीनिमित्त तहसीलदार मांडवगडे यांना पण डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही आणि बँडच्या तालावर तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी ठेका धरून भन्नाट डान्स केला. तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांनी या मिरवणूकीमध्ये भन्नाट डान्स करून आनंद व्यक्त केल्याने सोशल मिडीयावर तहसीलदारांच्या नृत्याची स्तुती होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या