26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeपरभणीथकीत पीकविम्यासाठी आग़ुट्टे यांचे कृषीमंत्र्यांना साकडे

थकीत पीकविम्यासाठी आग़ुट्टे यांचे कृषीमंत्र्यांना साकडे

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुंबई येथे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगाम २०२०चा थकीत पीकविमा देण्याची मागणी केली. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, गंगाखेड व पालम तालुक्यातील शेतक-यांना खरीप २०२०चा सोयाबीन व तूर या पिकांचा मंजूर असलेला पिक विमा अद्याप मिळाला नसल्याने शेतक-यावर हा एक प्रकारचा अन्यायच म्हणावा लागेल. जगाचा पोशिंदा म्हणणा-या बळीराजाला त्याच्या हक्काच्या पीक विम्यापासून वंचित ठेवने कितपत योग्य आहे? असा प्रश्नही आ.गुट्टे यांनी या पत्रातून उपस्थित केला आहे.

गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी मंडळातील ६४९७.१४ हे. क्षेत्राकरीता १३ कोटी ३८ लाख ४४ हजार ८६२ रुपये व सोनपेठ तालुक्यातील शेळगाव मंडळातील ३११७.७५ हे. क्षेत्राकरीता ६ कोटी ५८ हजार ८१५ रुपयांचा सोयाबीन या पिकांचा मंजूर असलेला पिक विमा आणि गंगाखेड तालुक्यातील ४३२४.७८ हे. क्षेत्राकरीता ११ कोटी ५१ लाख ९९ हजार २०१ रुपयांचा पिक विमा व पालम तालुक्यातील ६४६६.६ हे. क्षेत्राकरीता १८ कोटी ७७ लाख ७८ हजार ९२३ रुपयांचा तूर या पिकाचा मंजूर असलेला पिक विमा अद्याप शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केलेला नाही. सोयाबीन व तुर या पिकांचा एकूण ५० कोटी २६ लाख २३ हजार ८०४ रुपयांचा मंजूर असलेला पिक विमा शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यात यावा अशी मागणी आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या