27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeपरभणीदोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू

दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

परभणी: परभणी जिल्ह्यात कोरोनाचा संक्रमन सुरूच असून दररोज रूग्ण आढळून येत असतांनाच गेल्या चोवीस तासात दोन कोरोनाबाधीत रूग्णांचा मृत्यू झाला असून नव्याने ७ रूग्ण आढळून आले आहेत. तर सध्या २९ व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.

परभणी जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधीत रूग्ण आढळून येत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने विविध उपाय योजना राबविल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात जिल्हा परिषद नूतन इमारतीच्या कोविड सेंटरमधील एका कोरोनाबाधित व्यक्तीचा तर चिरायू हॉस्पिटलमधील एका कोरोनाबाधित व्यक्ती अशा एकूण दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ हजार २९६ एवढी झाली आहे

. जिल्ह्यात एकूण ७ व्यक्ती गेल्या चोवीस तासात केलेल्या चााचण्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. चोवीस तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाला उपचारानंतर सुट्टी देण्यात आली नाही. सद्यस्थितीत २९ व्यक्ती उपचार घेत आहेत. जिल्ह्यात चोवीस तासात २९४२ आरटीपीसीआर, रॅपीट चाचण्या करण्यात आल्या. त्यातून ७ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५१ हजार ४६० कोरोनाबाधीत आढळून आल्या असून ५० हजार १३५ रूग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या