24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीनाशिकच्या साहित्य संमेलनाचे कथाकार गहाळ यांना निमंत्रण

नाशिकच्या साहित्य संमेलनाचे कथाकार गहाळ यांना निमंत्रण

एकमत ऑनलाईन

परभणी : ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विज्ञान लेखक डॉ.जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.३,४, ५ रोजी नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस आडगाव येथे होणार आहे. या साहित्य संमेलनात दि.०४ डिसेंबर रोजी विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या दुपारच्या सत्रातील कथाकथन कार्यक्रमात परभणी शहरातील म.फुले विद्यालयातील सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांना निमंत्रित कथाकार म्हणून कथा सादर करण्याची संधि मिळाली आहे.

कथाकार गहाळ यांचे कोंडी, दोन एकर, पोशिंदा असे तीन कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या कोंडी कथा संग्रहातील भूक या कथेचा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. गहाळ यांना साहित्यिक क्षेत्रातील मानाचे पंचवीस राज्यस्तरीय पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन, संत जनाबाई ग्रामीण साहित्य संमेलन, अन्य मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद गहाळ यांनी भूषविले आहे.

नाशिक येथील साहित्य संमेलनात गहाळ यांची निमंत्रित कथाकार म्हणून निवड झाल्याबद्दल माजी आ.विजयराव गव्हाणे, आ.डॉ. राहुल पाटील, आ.विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण, अ‍ॅड.अशोक सोनी, अजयराव गव्हाणे, दादासाहेब नाईकवाडे, डॉ.आसाराम लोमटे, डॉ.अशोक जोंधळे, प्रा.केशव वसेकर, प्रा.आबासाहेब सावंत, प्रा.नारायण शिंदे, डॉ.अनिल कांबळे, डॉ.विवेक नावंदर आदिसह सर्व मित्र परिवारातुन स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या