परभणी : संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी विधवा सेवा योजनेचे अनेक पात्र लाभार्थी आहेत़ सदर लाभार्थ्यांचे अनुदान चालू ठेवण्यासाठी किंवा नवीन अनुदान चालू करण्यासाठी २१ हजार रूपयांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे़ .
परंतु प्रशासन स्तरावरून २१ हजार रुपये उत्पन्न देण्यात येत नसल्यामुळे सदरील योजनेच्या ब-याच लाभार्थ्यांचे अनुदान यापूर्वीच बंद करण्यात आले आहे़ यामुळे अनेक लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली असून या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे़.
या संदर्भातील निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, लाभार्थ्यांचे बंद केलेले अनुदान पूर्ववत चालू करण्यात यावे़ ज्या लाभार्थ्यांचे अनुदान चालू आहे व ज्या नवीन लाभार्थ्यांना अनुदान चालू करावयाचे आहे .त्या लाभार्थ्यांना २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे संबंधितांना आदेश देण्यात यावे़ सदर योजनेचे अनुदान मिळण्यासाठी २१ हजार रुपये ऐवजी ५० हजार रुपयाची मर्यादा करावी़.
याच बरोबर परभणी येथील तलाठी काळे यांची इतरत्र बदली करण्यात यावी आदी मागण्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश वर्कर्स काँग्रेस कमिटीच्या शेख जानुबी शेख शिखूर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आह़ या उपोषणात मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची उपस्थिती आहे़.