पूर्णा : छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे जावून औषधी घेण्याने आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात़ हे टाळण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वनौषधीचा वापर करावा, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ़ संजय दळवी यांनी केले.
पूर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास या विशेष शिबिराचे भाटेगाव येथे सुरू आहे. या शिबिरात तिस-या दिवशी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा़डॉ़दळवी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स कॉलेज नांदेड मधील प्रा़डॉ़उल्हास पत्की यांनी विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील करिअरच्या संधी यावर मार्गदर्शन केले. उपसरपंच रामराव क-हाळे, डॉ़शिवसांब कापसे, डॉ.जितेंद्र पुल्ले, डॉ़पल्लवी चव्हाण, डॉ़शेषेराव शेटे, डॉ़बाळासाहेब मुसळे, डॉ़संतोष चांडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ़पुष्पा गंगासागर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ गुंजकर, तर डॉ.अजय कु-हे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.राजू शेख, डॉ. ओंकार चिंचोले, डॉ.विनोद कदम, बालाजी आसोरे, कर्मचारी मंचक वळसे, नागोराव सावळे, गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.