29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeपरभणीपरभणी विधानसभा मतदार संघाला अतिवृष्टीचा सर्वाधिक ३३ कोटी निधी प्राप्त

परभणी विधानसभा मतदार संघाला अतिवृष्टीचा सर्वाधिक ३३ कोटी निधी प्राप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : सप्टेंबर- ऑक्टोबर २०२२मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पोटी परभणी विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक ३३ कोटी ६७ लाख रुपयाचा निधी मिळाला आहे. याबद्दल आमदार डॉ.राहुल पाटील यांचा परभणी विधानसभा मतदार संघातील शेतक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. परभणी जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात मोठी अतिवृष्टी झाली.

या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतक-यांना तात्काळ मदत देण्याच्या अनुषंगाने आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केलेल्या सरसगट मदतीच्या मागणीनुसार जिल्हा प्रशासनाने पंचनामे करत शासनाकडे मदतीचा अहवाल पाठवला होता. परभणी जिल्ह्यामध्ये ०२ लाख १५ हजार ९१५ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस या पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल पाठवला गेला. या संदर्भात आ.डॉ.पाटील

यांनी विधानसभा अधिवेशनात परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आक्रमकपणे लावून धरली होती

त्यानंतर शासनाने परभणी जिल्ह्यातील ९२ हजार ७३७ शेतक-यांना ७६ कोटी ३१ लाख ८० हजार रुपये मंजूर केले. ही रक्कम शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली. यामध्ये सर्वाधिक रक्कम परभणी तालुक्यातील ४२ हजार ११८ शेतक-यांना ३३ कोटी ६७ लाख ०६ हजार ८९६ रुपये मंजूर झाले आहेत. यात शेतक-यांना हेक्­टरी १३ हजार ६०० रुपये नुकसान भरपाई मिळत आहे

परभणी विधानसभा मतदार संघातील शेतक-यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत मिळवून दिल्याबद्दल सोमवारी आमदार डॉ.राहुल पाटील यांचा शेतक-यांच्या वतीने शिवाजीनगर येथील संपर्क कार्यालयात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉÞपाटील म्हणाले की, परभणी जिल्ह्याला आता अतिवृष्टीचे पैसे मिळाले आहेत
परंतू परभणी जिल्ह्यात सतत चार महिने झालेल्या पावसामुळे देखील मोठे नुकसान झाले आहे
सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे शेतक-यांना मिळावेत

यासाठी आपण पाठपुरावा करत आहोत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील याबाबतची घोषणा करीत सांगितले होते की, प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल. या समितीचा निर्णय झाल्यानंतर पैसे देण्यात येतील. परंतू अद्यापही रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे हे पैसे लवकरात लवकर न मिळाल्यास येणा-या अधिवेशनामध्ये या प्रश्नावर आपण आवाज उठवणार असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या