परभणी : येथील एस़टी़महामंडळ परीवहन विभागाचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची मुंबई सेंट्रल येथे बदली झाली आहे़ त्यांच्या जागी नागपूर येथील विभाग नियंत्रक निलेश बेलसरे सोमवार, दि. २५ जुलै रोजी रूजू झाले आहेत.
येथील एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी गेल्या ३ वर्षांपासून कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात एस़टी़महामंडळाला उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्याच कार्यकाळात एस़टी़महामंडळाचे परभणी येथील बसस्थानक एअर पोर्टच्या धर्तीवर उभारण्यास सुरूवात झाली आहे.
परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील ७ आगारातून ग्रामिण व लांब पल्ल्याच्या बसेस त्यांनी सुरू केल्या. तसेच पंढरपूरसह विविध यात्रा महोत्सवासाठी विशेष बसेस सोडण्याचे नियोजन करून परभणी आगाराच्या उत्पन्नात त्यांनी वाढ केली. मुंबई सेंट्रल त्यांची बदली झाली असून मुंबईत सुरू होत असलेल्या इलेक्ट्रीक बस प्रकल्पासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ मंगळवार, दि. २६ जुलै रोजी ते मुंबई येथे रूजू होणार आहेत. त्यांच्या जागी नागपूर येथील विभाग नियंत्रक बेलसरे रूजू झाले आहेत.